शाशकीय

बापरे…… बहिसेबी कोट्यवधी रुपयांची रोकड आणि सोने 

Spread the love

49 भूखंड, 14 एकर परिसरात असलेले तीन आलिशान फॉर्म हाऊस 

भुवनेश्वर /विशेष प्रतिनिधी 

                   विजिलंस विभागाच्या धडक कारवाईत मोठे धबाड सापडले आहे. या विभागाच्या अधिकाऱ्यांनी एका सहाय्यक कार्यकारी अभियंत्याच्या घरावर टाकलेल्या धाडीत कोट्यवधीची बेहिशेबी मालमत्ता आढळली आहे. या धाडीत  महागड्या ले आऊट मध्ये 49 भूखंड, 14 एकर परिसरात पसरलेले तीन आलिशान फॉर्म हाऊस एक किलो सोन्याचे दागिने, अडीच किलो चांदी अशी मालमत्ता सापडली आहे. इतके मोठे धबाड पाहून अधिकाऱ्यांचे डोळे फाटले आहेत.

हे प्रकरण कोरापुट जिल्ह्यातील कोटपाडा ब्लॉकमधील आहे. येथे कार्यरत असलेले सहाय्यक कार्यकारी अभियंता (Assistant Executive Engineer – AEE) सत्यनारायण सेठी यांना उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली.

उत्पन्नापेक्षा अनेकपटीने जास्त मालमत्ता

तपासादरम्यान सेठी यांच्याकडे त्यांच्या ज्ञात उत्पन्न स्रोतांपेक्षा कितीतरी अधिक मालमत्ता आढळून आली. यामध्ये दोन फ्लॅट्सचाही समावेश आहे. त्यापैकी एक फ्लॅट कथितपणे बेनामी असल्याचे तपासात समोर आले आहे.

विजिलन्स अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेमध्ये

14 एकर क्षेत्रात पसरलेली 3 फार्महाऊस
49 प्लॉट
940 ग्रॅम सोन्याचे दागिने
2.5 किलो चांदी
5.48 लाख रुपये रोख रक्कम
60.92 लाख रुपयांहून अधिक बँक ठेवी
एक चारचाकी वाहन (कथित बेनामी)

7 डीएसपी आणि 9 निरीक्षकांच्या पथकाची कारवाई

या छाप्यासाठी ओडिशा विजिलन्स विभागाने सात विशेष पथके तयार केली होती. या संपूर्ण मोहिमेचे नेतृत्व सात डीएसपी (Deputy Superintendent of Police) करत होते. पथकांमध्ये 9 निरीक्षक (Inspectors), 11 एएसआय (Assistant Sub-Inspectors) आणि इतर कर्मचारी सहभागी होते.

अधिकाऱ्यांनी सांगितले की या मालमत्तेबाबत समाधानकारक स्पष्टीकरण देण्यात सेठी अपयशी ठरले. त्यामुळे त्यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 2018 (Prevention of Corruption Act, 2018) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

7,100 रुपयांच्या पगारापासून सुरुवात

सत्यनारायण सेठी यांनी 1998 मध्ये कनिष्ठ अभियंता (Junior Engineer – JE) म्हणून सरकारी सेवेत प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांचा मासिक पगार केवळ 7,100 रुपये होता. यानंतर 17 वर्षांच्या सेवेनंतर 2015 मध्ये त्यांची सहाय्यक अभियंता (Assistant Engineer – AE) पदावर पदोन्नती झाली आणि त्यांची कोटपाडा ब्लॉकमध्ये नियुक्ती करण्यात आली.

जून 2020 मध्ये त्यांची बदली बोरिगुमा ब्लॉकमध्ये करण्यात आली होती. त्यानंतर 2025 मध्ये त्यांना सहाय्यक कार्यकारी अभियंता (AEE) या वरिष्ठ पदावर बढती मिळाली. बढतीनंतर त्यांची पुन्हा कोटपाडा ब्लॉकमध्ये नियुक्ती करण्यात आली होती. मात्र आता विजिलन्स विभागाच्या कारवाईनंतर त्यांच्याकडे असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या कथित बेहिशेबी मालमत्तेचा पर्दाफाश झाला असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close