सामाजिक

भारतात फिरायला येण परदेशी पर्यटकांच्या जीवावर बेतले

Spread the love

स्विमिंग पूल मध्ये दोन विदेशी पर्यटकांचा मृत्यू

बेगळुरू / विशेष प्रतिनिधी 

             भारतात सुट्ट्या घालवण्यासाठी येणे दोन विदेशी पर्यटकांच्या जीवावर बेतले आहे. स्विमिंग पूल मध्ये पोहताना विजेचा धक्का लागून दोघांचा मृत्यू झाला आहे. घटना बेंगळुरूतील कॉनराड हॉटेलच्या स्विमिंग पूलमध्ये घडली आहे. मृतांमध्ये जर्मनी आणि स्लोव्हाकियाच्या नागरिकांचा समावेश आहे.

या दोघांना वाचवण्याचा प्रयत्न करताना अमेरिकेचा एक नागरिक आणि पूल अटेंडंटही जखमी झाले आहेत.

या घटनेप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला असून हॉटेल व्यवस्थापनाला आरोपी करण्यात आले आहे. मृत जर्मन नागरिक अलेक्झांडर यांच्या पत्नी सिल्व्हिया ओटावा यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे.

एफआयआरनुसार शुक्रवारी रात्री उशिरा हे दोघे हॉटेलच्या स्विमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी गेले होते. पूलमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असताना पाण्यात असतानाच त्यांना विजेचा धक्का बसल्याचा आरोप आहे. त्यानंतर दोघेही पाण्यात बुडाले.

सीएनएन-न्यूज18 शी बोलताना पोलीस सूत्रांनी सांगितले की, अलेक्झांडर यांच्या कुटुंबीयांनी स्विमिंग पूलची देखभाल आणि हॉटेलमध्ये वास्तव्यास असलेल्या पाहुण्यांच्या सुरक्षेबाबत हॉटेल व्यवस्थापनाने निष्काळजीपणा केल्याचा आरोप केला आहे.

बचावकार्यादरम्यान अमेरिकेचा नागरिक आणि पूल अटेंडंट जखमी

बेंगळुरूमधील हलासुरू परिसरात असलेल्या कॉनराड हॉटेलमध्ये ही घटना घडली. मृत झालेले दोघेही या हॉटेलमध्ये वास्तव्यास होते. हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या स्विमिंग पूलमध्ये ते पोहत असताना ही घटना घडली.

हॉटेलमध्येच वास्तव्यास असलेला अमेरिकेचा नागरिक मॅथ्यू डिसँटिस आणि पूल अटेंडंट राहुल तिवारी यांनी दोघांना वाचवण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात ते दोघेही जखमी झाले. दोघांनाही उपचारांसाठी मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे. विजेचा धक्का नेमका कसा बसला, याचा पोलीस तपास करत आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close