क्राइम

मुग्धा देशमुख प्रकरणात नवा ट्विस्ट, भारतात येण्याच्या पाच महिन्यापूर्वीच खरेदी केला फ्लॅट 

Spread the love

पुणे /  नवप्रहार टीम

                   पोलिस आणि कुटुंबियांसाठी मिस्ट्री बनलेल्या मुग्धा देशमुख प्रकरणात नवीन ट्विस्ट आला आहे. पोलिस तपासात ती ऑगस्ट महिन्यात पुण्याला आली असे समोर आले आहे.पण तिने एप्रिल महिन्यातच राहत असलेला फ्लॅट खरेदी केल्याची माहिती उघड झाली आहे. शिक्षण घेत असताना तिने फ्लॅट कसा काय खरेदी केला ? हा पोलिस यंत्रणेसाठी महत्वाचा विषय झाला आहे. पोलिस त्या दिशेने तपास करत आहेत.

 लंडनहून उच्च शिक्षणासाठी गेलेली आणि पुण्यात येऊन गुपचूप राहिलेल्या मुग्धा देशमुख हिच्या मृत्यू प्रकरणाचे गूढ दिवसेंदिवस वाढत आहे.

मुग्धा जरी पु्ण्यात ऑगस्ट महिन्यात राहण्यासाठी आली असली तरी तिने पुण्यातील फ्लॅट एप्रिल महिन्यातच घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राने या संदर्भात वृत्त दिले आहे. या माहितीमुळे प्रकरणाला वेगळा ट्विस्ट मिळाला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, मुग्धा ही जुलै 2025 MBA चे शिक्षण पूर्ण करण्यासाठी लंडनला गेली होती, मात्र अवघ्या वर्षभरातच तिने पुण्यात एक फ्लॅट खरेदी केला होता. विशेष म्हणजे, मुग्धा लंडनहून पुण्यात ऑगस्ट महिन्यात परतली होती, परंतु तिने येण्यापूर्वीच म्हणजे एप्रिल एप्रिल 2026 मध्ये पुण्यात फ्लॅट घेतल्याची माहिती आता समोर आली आहे. याचे तिच्या मृत्यूशी नेमकं काय कनेक्शन याविषयी आता पोलीस आणि यंत्रणांकडून सखोल तपास सुरू आहे.

काय आहे नेमका घटनाक्रम?


मिळालेल्या माहितीनुसार, मुग्धा देशमुख हिने जुलै 2025 मध्ये लंडन गाठले होते. परदेशात असताना तिने पुण्यात राहण्यासाठी घर शोधत होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, तिने ऑगस्ट महिन्यात पुण्यात पाऊल ठेवण्यापूर्वीच, म्हणजेच एप्रिल 2026 मध्येच पुण्यात एक फ्लॅट खरेदी केला होता. लंडनहून परतल्यानंतर अवघ्या काही दिवसातच घडलेल्या या घडामोडींमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

मुग्धाच्या वडिलांनी तक्रार देताना काय म्हटलं?


आम्हाला मुग्धाचे वास्तव्य लंडनमध्ये असणे अपेक्षित होते. त्यामुळे आम्ही तेथील प्रशासनाकडे तक्रार केली भारतीय उच्च आयुक्तांकडे ही तक्रार नोंद केली. परंतू त्यांचं काही उत्तर आलं नाही, असं मुग्धाच्या वडिलांनी मिसिंग कंप्लेन्टमध्ये म्हटलं आहे. त्यानंतर मी तिचं HDFC बँक खाते क्रमांक 5*******3 चा उतारा काढला असता, तीचे वरील खात्यावरुन Zomato, Blinkit, swiggy, book my show, make my trip, VFS ग्लोबल सर्व्हिस ईत्यादी वर क्रेडीट कार्डव्दारे UPI व्दारे पेमेंट झाली आहे, असं मुग्धाच्या वडिलांनी सांगितलं.

तपास यंत्रणांनी चक्र फिरवली

मुग्धाच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नसले तरी, तिने एवढ्या कमी अवधीत फ्लॅट खरेदी करण्यामागे नेमकी काय पार्श्वभूमी होती, यादरम्यान तिचा संपर्क कोणाकोणाशी आला, याचा कसून तपास आता पुणे पोलीस करत आहेत. या प्रकरणी आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close