शाशकीय

बुलेट च्या कर्णकर्कश सायलेंसर वर एसपी चा प्रहार

Spread the love

 

अकोला वाहतूक पोलिसांचा रोड रोलरने केला चक्काचूर

अकोला /प्रतीनिधी 

बुलेट प्रेमींना दणका! रस्त्यावर फटाक्यांसारखे कर्कश आवाज काढून दहशत माजवणाऱ्या बनावट सायलेन्सरवर अकोला शहर वाहतूक शाखेने रोड रोलर फिरवला आहे. या विशेष मोहिमेत तब्बल *३५० बनावट बुलेट सायलेन्सर आणि ७० फॅन्सी नंबर प्लेट्स* जागीच नष्ट करण्यात आल्या.

गेल्या अनेक दिवसांपासून बुलेटला बेकायदेशीर सायलेन्सर लावून मोठ्या आवाजात गाड्या चालवण्याच्या प्रकारात वाढ झाली होती. या कर्णकर्कश आवाजामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, रुग्ण आणि विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. याबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढल्याने वाहतूक शाखेने विशेष मोहीम हाती घेतली होती.

मोटार वाहन कायद्यान्वये ८० डेसिबलपेक्षा जास्त आवाज करणाऱ्या सायलेन्सरवर कारवाईचा बडगा उगारत पोलिसांनी जिल्हाभरातून ३५० सायलेन्सर जप्त केले. यासोबतच गाड्यांवर ‘दादा, भाऊ, मामा, काका’ असे बेकायदेशीर शब्द लिहिलेल्या ७० फॅन्सी नंबर प्लेट्सवरही कारवाई करण्यात आली.

पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर कारवाई

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विलास पाटील यांच्या नेतृत्वात ही धडक मोहीम राबविण्यात आली. न्यायालयाची परवानगी घेऊन जुन्या पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरील आम रोडवर या सर्व जप्त केलेल्या साहित्यावर रोड रोलर फिरवून त्याचा चक्काचूर करण्यात आला.

पोलिसांचे कडक आवाहन

यापुढे बुलेटधारकांनी कंपनीने दिलेल्या मूळ सायलेन्सरचाच वापर करावा. बनावट सायलेन्सर आढळल्यास मोटार वाहन कायद्यानुसार कडक दंडात्मक कारवाई करून सायलेन्सर जप्त केला जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

तसेच वाहन चालवताना परवाना आणि कागदपत्रे सोबत ठेवावीत आणि ई-चलानचा थकीत दंड त्वरित वाहतूक शाखेत जमा करावा, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close