क्राइम

वेकोलीच्या सुरक्षारक्षकाची हत्या 

Spread the love

वणी (यवतमाळ) / विशेष प्रतिनिधी 

               यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथून एक खळबळजनक घटना समीर आली आहे. येथे कर्तव्यावर असलेल्या सुरक्षा रक्षकाची हत्या करण्यात आली आहे. घटना प्रगतीनगर वसाहत परिसरातील वेकोलीच्या उपक्षेत्रीय प्रबंधक कार्यालयात घडली आहे. 

या घटनेने खळबळ उडाली आहे. ओमप्रकाश हरिप्रसाद (४५) असे मृत सुरक्षा रक्षकाचे नाव असून रविवारी सायंकाळपर्यंत मारेकऱ्यांचा सुगावा लागला नव्हता. वणी पोलिस या घटनेचा तपास करीत आहेत.

वणी परिसरात वेकोलिच्या कोळसा खाणींमध्ये कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी विविध निवासी वसाहती उभारण्यात आल्या आहेत. याच वसाहतींमध्ये वेकोलिच्या अधिकाऱ्यांची कार्यालयेही आहेत. प्रगतीनगर येथील उपक्षेत्रीय प्रबंधक यांच्या कार्यालयात ओमप्रकाश हरिप्रसाद नामक सुरक्षा रक्षक रात्रीच्या सुमारास नियमित कर्तव्य बजावत होता. दरम्यान, रात्री ११ वाजताच्या सुमारास अज्ञात मारेकऱ्यांनी त्याच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. या हल्ल्यात सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच वणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणातील आरोपीचा शोध पोलिस घेत आहे. मात्र रविवारी सायंकाळपर्यंत आरोपींचा कुठलाही सुगावा पोलिसांना लागला नव्हता. कर्तव्यावर असलेल्या सुरक्षा रक्षकाची हत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली, हल्लेखोर कोण होता, याचा तपास पोलिस करीत आहेत. वेकोलिच्या निवासी वसाहतीतील कार्यालयातच सुरक्षा रक्षकाची हत्या झाल्याने परिसरातील सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. या हत्या प्रकरणाचे गूढ उकलण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close