क्राइम
आर्वी पोलिसांची धडाकेबाज कारवाई, गांजा तस्कराला गांजा सह अटक

4 की.90 ग्रॅम गांजा आणि एकूण 2 लाख 48 हजार 720 रुपयांचा मुद्देमाल जप्त
आर्वी / प्रवीण वानखेडे
आर्वी पोलिसांनी गांजा तस्कराला अटक करत त्याच्या जवळून 4 की.90 ग्रॅम गांजा आणि 48 हजार 720 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
आर्वी पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती की नागपूर वरून एक व्यक्ती गांजा घेऊन तो विक्री करण्यासाठी आर्वी येथे घेऊन येत आहे. पोलिसांनी सापळा रचत नागपूर वरून येणाऱ्या विना नंबरच्या मोपेड गाडी ला थांबवून विचारपूस केली असता शेख गुड्डू शेख आसिफ हा समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. त्याच्या वाहनाची झडती घेतली असता त्यात 4 किलो 900 ग्रॅम गांजा आढळून आला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतली .त्याच्या जवळून मोबाईल गांजा आणि वाहन जप्त करण्यात आले. ज्याची एकूण किंमत 2 लाख 48 हजार 720 रु. जप्त केली.
आरोपी विरोधात आर्वी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास आर्वी पोलीस करीत आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल अपराधीक्षक सदाशिव वाघमारे उपविभागीय अधिकारी वंदना कारखिले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश देहंकर यांच्या मार्गदर्शनात मल्हार ताळकोटे हवालदार निलेश पेटकर मंगेश वाघाडे सुरज मेंढे आकाश चोरपगार रोशन टेंबरे बाळासाहेब गवळी करीत आहे वर्धा येथील सायबर पथकमधील अक्षय राऊत गोविंद मुंडे व त्यांच्या पथकाने कारवाई केली.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1




