क्राइम

६० वर्षाच्या दोन म्हाताऱ्यांकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

Spread the love
कल्याण / विशेष प्रतिनिधीं
                      कल्याण परिसरातील एका खोलीतून मुलीच्या ओरडण्याचा आवाज येत असल्याने स्थानिक नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठत दोघांना अटक केली आहे. मुख्य म्हणजे हे दोघे नराधम ६० वर्षाचे म्हातारे असून त्यांचा गरीब मुलींना आणून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणे हा व्यवसाय असल्याचे समजत आहे. अख्तर मनियार आणि सलीम शेख अशी त्या नराधमांची नावे असून पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.
कल्याणमध्ये अतिशय धक्कादायक घटना घडली आला आहे. एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोघा म्हाताऱ्या व्यक्तींनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात कोळसेवाडी पोलिसांनी अख्तर मनियार आणि सलीम शेख या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे हे दोघे ६० वर्षांचे आहेत. अल्पवयीन मुलीला आपल्या घरात बोलून तिच्यावर दोघांनी अत्याचार केला अल्पवयीन मुलीने आरडाओरडा केल्यानंतर आजूबाजूच्यांनी पोलिसांना ही माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मुलीची सुटका करत या
दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
कल्याण पूर्व येथील कोळसेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली. येथील एका घरातून एका १५ वर्षांच्या मुलीचा आरडाओरडा ऐकू येत होता. मुलीचा ओरडाओरड सुरू असताना आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना जाग आली. लोकांनी घरात जाऊन पाहिले तर घरभर रक्त पसरलेले होते. लोकांनी याबाबत कोळसेवाडी पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटना स्थळी दाखल झाले. या प्रकरणात पोलिसांनी कोणतीही माहिती अद्याप दिलेली नाही.
घरातच तिच्यावर लैंगिक अत्याचार
मात्र, पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अतिशय धक्कादायक आहे. आरोपींमध्ये अख्तर मणियार आणि सलीम शेख यांची नावं समोर आली आहे. ही दोघे रात्रीच्या वेळी एका पंधरा वर्षांच्या मुलीला घरात घेऊन आले होते. घरातच तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची माहिती आहे. ही मुलगी गरीब कुटुंबातील असल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मणियार हा एपीएमसी मार्केटमध्ये चहा विक्रीचा व्यवसाय करतो. तर सलीम हा रिक्षा चालक आहे. हे नेहमी विविध मुलींना रात्रीच्या वेळी या घरात घेऊन येतात.  नेहमीप्रमाणे काल देखील त्यांनी अशाच प्रकारचे कृत्य केले.
लोकप्रतिनिधी झाले आक्रमक
या वेळेला अचानक या घरातून आरडाओरडीचा आवाज आला आणि त्यानंतर आजूबाजूच्या रहिवाशांनी पोलिसांना फोन करून ही घटना सांगितली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दरवाजा उघडला असता पूर्ण घरामध्ये रक्त पडलेले दिसले. यानंतर हा संपूर्ण प्रकार समोर आला सध्या पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत गुन्हा दाखल करून पुढचा तपास सुरू केला आहे. मात्र, कल्याण कोळसेवाडी परिसरात वारंवार अल्पवयीन मुलीवरती होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात आता स्थानिक आमदार सुलभा गायकवाड, शिवसेना शिंदे ग नगरसेवक महेश गायकवाड, यासह अन्य नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close