क्राइम

पतीच्या विरोधात तक्रार देण्यास आलेल्या महिलेवर पोलिस कर्मचाऱ्याकडून अत्याचार 

Spread the love
पाच पोलिसांवर निलंबनाची कारवाई 
              कर्तव्यावर असलेल्या पोलिस पोलिस कर्मचाऱ्याकडून पोलिस स्टेशन मध्ये तक्रार देण्यास आलेल्या महिलेवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्या आहे.या घटनेने पोलिस वर्तुळात खळबळ माजली आहे.

नवऱ्याने केलेल्या मारहाणीच्या भीतीपोटी पोलिसांकडे तक्रार देण्यासाठी गेलेल्या एका पीडित महिलेवर पोलीस ठाण्यातीलच एका वायरलेस ऑपरेटरने बलात्कार केल्याचा गंभीर आरोप आहे. या घटनेमुळे पोलीस दलाची नाचक्की झाली असून, संपूर्ण राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. झारखंडच्या सरायकेला-खरसावां जिल्ह्यातील ही घटना आहे.

खोलीतून कपडे जप्त

मिळालेल्या माहितीनुसार, घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मुख्य आरोपी वायरलेस ऑपरेटर नीरज लकडा याला अटक केली आहे. यानंतर त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. तसेच, त्याच्या खोलीतून कपडे जप्त करून ते फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या गंभीर प्रकरणाची दखल घेत एका विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना केली असून इतर पैलूंचा कसून तपास सुरू आहे.

पाच पोलीस कर्मचारी निलंबित

कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी आणि बेशिस्त वर्तनामुळे पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. या प्रकरणी इन्स्पेक्टर संजय प्रसाद, दोन सब इन्स्पेक्टर (अनिरुद्ध सिंह, मनोज साहू), एक सिपाही (संतोष राय) आणि एक हवलदार (मुनेश्वर कुमार) अशा एकूण पाच पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून त्यांना सरायकेला पोलीस मुख्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

नागरिकांच्या सुरक्षेची हमी कोण देणार?

या घटनेमुळे विरोधी पक्षांनी राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनाला धारेवर धरले आहे. पोलीस ठाण्याच्या सुरक्षित भिंतींच्या आतच महिला सुरक्षित नसतील, तर सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेची हमी कोण देणार, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात असून, निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close