शाशकीय
एकमेकांच्या विरोधात भांडून स्वतःचे करिअर उध्वस्त करू नका – सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली / विशेष प्रतिनिधी
महिला आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या मधात मागील तीन वर्षापासून सुरू असलेल्या वादातून तोडगा काढा कारण यात दोघांचे करिअर उध्वस्त होईल अशी टिपणी सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात केली असून माजी न्यायाधीश कुरियन जोसेफ यांना आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांमधील वाद सोडवण्याचा आग्रह केला आहे.
आयएएस अधिकारी रोहिणी सिंदुरी आणि आयपीएस रुपा मुदगिल यांच्यात बऱ्याच काळापासून कायदेशीर वाद सुरू आहे. या वादातून तोडगा काढण्याची जबाबदारी सर्वोच्च न्यायालयानं माजी न्यायमूर्तींकडे सोपवली आहे. या दोन्ही महिला अधिकारी जुलैमध्ये जोसेफ यांच्या समोर हजर होतील.
आयएएस रोहिणी सिंदुरी आणि आयपीएस रुपा मुदगिल या दोघी कर्नाटक केडरच्या ऑल इंडिया सव्हिर्सेसच्या अधिकारी आहेत. त्या दोघी गेल्या ३ वर्षांपासून एकमेकांविरोधात मानहानीचा खटला लढत आहेत. २०२३ मध्ये एका जाहीर कार्यक्रमात त्यांच्यात वितुष्ट आलं. तेव्हापासून सुरू झालेला वाद आजतागायत कायम आहे.
सर्वोच्च न्यायालयानं अधिकाऱ्यांमधील वादाची दखल घेतली आहे. न्यायमूर्ती सतीश चंद्र शर्मा आणि संजीव सचदेवा यांच्या खंडपीठानं सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती जोसेफ कुरियन यांना या प्रकरणात मध्यस्थी करण्याचा आग्रह केला आहे. एकमेकांविरोधात कायदेशीर लढा देऊन दोन्ही अधिकारी त्यांचं करिअर उद्ध्वस्त करत असल्याची टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठानं केली. या वादातून तोडगा काढण्यासाठी सगळ्या शक्यता पडताळून पाहण्याच्या सूचना न्यायालयानं दोन्ही अधिकाऱ्यांच्या वकिलांना दिल्या. दोघींच्या वकिलांनी न्यायालयाचा सल्ला मान्य केला.
सर्वोच्च न्यायालयानं दोन्ही अधिकाऱ्यांना जुलैमध्ये न्यायमूर्ती (निवृत्त) जोसेफ यांच्या समोर हजर राहण्याचे आदेश दिले. सर्वोच्च न्यायालयानं सत्र न्यायालयात दोन्ही अधिकाऱ्यांनी एकमेकांविरोधात दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्यांवरील सुनावणी रोखली आहे




