भ्रष्ट्राचार

धामणगाव तहसील कार्यालयातील प्रस्तुतकार १ झाला अप्पर जिल्हाधिकऱ्यांचा बॉस !

Spread the love
अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची करतो अवहेलना 
अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशा नंतरही  ‘ चिरीमिरी ‘ घेतल्याशिवाय देत नाही आदेश 
धामणगाव रेल्वे / एस कुमार 
                  धामणगाव रेल्वे तहसील कार्यालयात प्रस्तुतकार -१ (RC -1 ) पदावर कार्यरत अंकुश चवरे हा अप्पर जिल्हाधिकाऱ्यां पेक्षाही मोठा झाल्याचा प्रत्यय नागरिकांना येत आहे. चोरे याच्या कडून अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अवहेलना होत असल्याची धक्कादायक आणि खेदजनक बाब समोर येत आहे,.वरिष्ठांनी परिस्थिती हाताबाहेर जाण्यापेक्षा वेळीच याकडे लक्ष द्यावे अशी मागणी जोर धरत आहे.
                        धामणगाव रेल्वे तहसील कार्यालयात कार्यरत प्रस्तुतकार -१अंकुश चवरे अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचा बॉस असल्या प्रमाणे वागत आहे. अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशा नंतरही हा त्यावर कारवाई करीत नसल्याने अप्पर जिल्हाधिकारी मोठे अथवा अंकुश चवरे ? असा रास्त प्रश्न जनतेला पडला आहे.
अप्पर जिखाधिकाऱ्यांच्या पत्रानंतरही कारवाईस ‘ चिरीमिरी ‘ साठी केला जातो उशीर – अवैध गौण खनिज परिवहन करतांना जर गाडी पकडल्या गेली तर तहसीलदार अथवा संबंधित अधिकाऱ्यां कडून त्यावर दंड ठोठावल्या जातो.त्यावर एसडीएम, जिल्हाधिकारी यांच्याकडे दाद मागावी लागते.त्यांना या कारवाईत नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आल्यास ते नियमाप्रमाणे दंड आकारून वाहन सोडण्याचे आदेश निर्गमित करतात. त्या आदेशा नंतर वाहन सोडण्यासाठी संबंधित तहसीलदार यांचे पत्र असणे आवश्यक असते. अर्थातच ते पत्र प्रस्तुतकार १ हाच तयार करतो. पण या स्वरूपाचे काम अंकुश चवरे कडे आल्यास  तो ‘ चिरीमिरी ‘ साठी असे काम थांबवून ठेवत असल्याचे बोलल्या जात आहे.
ही तर वरिष्ठांच्या आदेशाची अवहेलना – वरिष्ठांनी आदेश केल्यावर त्या आदेशाला क्रियानवीत करण्याची जबाबदारी ही संबंधित प्रस्तुतकार १ यांची असते. पण त्या आदेशावर चोरे हे कारवाई न करता त्यांना मार्जित येईल त्या प्रमाणे वागत असल्याने ही वरिष्ठांच्या  आदेशाची अवहेलना असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
वरिष्ठांनी वेळीच लक्ष देण्याची  गरज – प्रस्तुतकार १ चवरे  याने चालविलेल्या या अनागोंदी कारभाराला वरिष्ठांची सहमती असल्याचा मॅसेज जनतेत जात आहे. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वीच वरिष्ठांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी जोर धरत आहे. ( क्रमशः )
अंकुश चवरे याचे एका पेक्षा एक कारनामे वाचण्यासाठी वाचत राहा नवप्रहार
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close