सामाजिक

दहशतवादी हल्ला उधळण्यात लष्कराला यश 

Spread the love

श्रीनगर / नवप्रहार न्यूज नेटवर्क

                   गेल्या काही दिवसात काश्मीरमध्ये दहशतवादी पुन्हा सक्रिय झाले आहेत. पुलवामा येथे मोठ्या हल्ल्याच्या तयारीत असलेल्या एका दहशतवाद्याला भारतीय सुरक्षा यंत्रनांनी 5 किलो आईडी स्फोटका सह पकडले आहे. 

इश्फाक अहमद वानी असे या दहशतवाद्याचे नाव असून त्याची रविवारी रात्री उशिरापर्यंत विविध तपास यंत्रणांमार्फत कसून चौकशी सुरू होती. दरम्यान, हा प्रकार उघडकीस आल्यानंतर भारतीय सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर असून परिसरात सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. पुलवामा येथे काही दहशतवादी लपले असून त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर स्फोटके असल्याची माहिती भारतीय जवानांना विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली होती. त्यानुसार रविवारी या परिसरात जवानांनी शोधमोहीम राबविली.

भारतीय जवान येत असल्याची कुणकुण लागताच दहशतवाद्यांनी तेथून पळ काढला, परंतु यावेळी पळण्याच्या प्रयत्नात असणार्‍या इश्फाकला पकडण्यात भारतीय जवानांना यश आले. त्याच्याकडून जवानांनी मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा साठा आणि काही हत्यारेही जप्त केली असून इतर दहशतवाद्यांचा शोध सुरू केला आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close