हटके

मुलगा गर्लफ्रेंड सोबत दिसला ; आईने चपलेने धू धू धुतला 

Spread the love
कानपूर / नवप्रहार ब्युरो
               या आधुनिक युगात प्रेम स्टेटस सिम्बॉल झाले आहे. वयात आलेली मुले कधी एकमेकांच्या प्रेमात पडतील याचा काहीच नेम नाही . असाच एका मुलीच्या प्रेमात पडलेल्या मुलाला भर चौकात आईचा मार खावा लागला आहे. त्यालाच नाही तर त्यांच्या प्रेयसीला सुद्धा मुलाच्या आईने चांगलेच बदडले आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये आईला न सांगता गर्लफ्रेंडला भेटायला जाणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. तरुण त्याच्या गर्लफ्रेंडसोबत एका चौकात चायनीज खात होता. त्याच रस्त्यावरून त्याचे आई-बाबा जात होते. मुलाला एका मुलीसोबत पाहताच आई प्रचंड चिडली. त्यांना जोरजोराने ओरडू लागली. हे पाहताच मुलाची गर्लफ्रेंड तिच्या स्कूटरवरून पळून जाऊ लागली.
गुजैनी येथील एक तरुणी तिच्या बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी रामगोपाल चौकात पोहोचली. दोघेही भेटले, गप्पा मारल्या. त्यानंतर खाण्यासाठी एका चायनीजच्या दुकानात गेले आणि चायनीज खाऊ लागले. मुलगा त्याच्या आईशी खोटं बोलून आला होता. याच दरम्यान, आई काही कामासाठी चौकातून जात असताना, तिने तिच्या मुलाला त्याच्या गर्लफ्रेंडसोबत चायनीज खाताना पाहिला. मग आई रागावली आणि तिने चौकात दोघांनाही शिवीगाळ करायला सुरुवात केली.
आईने मुलाला चपलेने मारायला सुरुवात केली. त्यावेळी गर्लफ्रेंडने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. ती त्याला स्कुटी वर घेऊन पळण्याच्या तयारीत असताना मुलाच्या आईने तरुणाच्या आईने धावत जाऊन दोघांनाही पकडलं आणि मग भररस्त्यात तुफान राडा झाला.
 आईने सर्वात आधी आपल्या मुलाला चपलेने धू धू धुतलं आणि नंतर त्याच्या गर्लफ्रेंडचेही केस ओढून मारहाण करण्यास सुरुवात केली. हे पाहताच आजूबाजूला लोकांची गर्दी जमली. लोकांनीच दोघांनाही आईच्या तावडीतून सोडवलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं.
त्यांनी दोघांनाही पोलीस ठाण्यात आणलं. येथे दोघांचंही समुपदेशन करण्यात आलं आणि त्यांना त्यांच्या घरी परत पाठवण्यात आलं. सध्या या घटनेची सर्वत्र चर्चा रंगली आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close