झू बाहेरून पत्नी प्रियकरासोबत फरार, पती ठाण्यात

ही घटना मध्य प्रदेशातील ग्वालियरमध्ये घडून आली. नववधू आपल्या पतीसह प्राणीसंग्रहायल पाहायला आली होती. वधू आली तर नवऱ्यासोबत होती पण जाताना ती आपल्या प्रियकरासोबत फरार झाली. पती गाडी पार्क करायला जात आहे हे पाहून तिने संधाचा फायदा घेतला आणि अवघ्या काही सेकंदातच प्रियकराच्या गाडीवर बसून ती तिथून निघून गेली. व्हिडिओमध्ये घटनाक्रम स्पष्ट दिसून येतो. प्रियकर दुचाकीला इतक्या स्पीडमध्ये चालवतो की काही सेकंदातच गाडी दिसेनाशी होती.
हे जोडपे मध्य प्रदेशातील शिवपूरीचे रहिवासी असल्याचे समोर येत आहे. पत्नीला अचानक गायब झाल्याचे पाहून पतीने पोलिस स्थानकाला भेट दिली. तिथे हरवल्याची तक्रार त्याने दाखल केली पण खरं प्रकरण तर पुढे जाऊन उलगडलं. पत्नीचा शोध घेण्यासाठी आणि लग्नानंतर लगेचच ही घटना का व कशी घडली, हे निश्चित करण्यासाठी पोलीसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाइल लोकेशन डेटाची तपासणी करायला सुरुवात केली. या तपासात उघड झाले की, नववधू हरवली नाही तर प्रियकरासोबत पळून गेली आहे.




