हटके

पती सोबत झू फिरायला गेलेली पत्नी बेपत्ता

Spread the love
पति गेला गाडी पार्क करायला आणि पत्नी झाली गायब पतीला वाटले पत्नी हरवली पोलीस स्टेशन मध्ये तक्रार द्यायला गेल्यावर भलताच प्रकार आला समोर. 
                    सध्या देशात विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात वाढ होत असल्याने क्राईम रेट वाढत चालला आहे. अनैतिक संबंधातून खून , हत्या झाल्याची अनेक प्रकरणे समाज माध्यमावर पाहायला मिळतात. विवाहबाह्य संबंधातून काही दिवसांपूर्वीच लग्न झालेली महिला आपल्या प्रियकराच्या बाईक वर बसून पळून गेल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे. 
 
या व्हिडिओत नववधू पतीला चकवा देत प्रियकरासोबत फरार होताना दिसून आली. मुख्य म्हणजे, पती स्कूटर पार्क करायला गेल्यानंतर ही घटना घडली ज्यामुळे पत्नी फरार आहे याची माहिती पतीला मिळाली नाही. उलट आपली पत्नी हरवली आहे असा गैरसमज मनात घेऊन तो पोलिस स्टेशनला दाखल झाला. पोलिसांना जेव्हा सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा खरी घटना समोर आली. या घटनेचा एक मजेदार सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

ही घटना मध्य प्रदेशातील ग्वालियरमध्ये घडून आली. नववधू आपल्या पतीसह प्राणीसंग्रहायल पाहायला आली होती. वधू आली तर नवऱ्यासोबत होती पण जाताना ती आपल्या प्रियकरासोबत फरार झाली. पती गाडी पार्क करायला जात आहे हे पाहून तिने संधाचा फायदा घेतला आणि अवघ्या काही सेकंदातच प्रियकराच्या गाडीवर बसून ती तिथून निघून गेली. व्हिडिओमध्ये घटनाक्रम स्पष्ट दिसून येतो. प्रियकर दुचाकीला इतक्या स्पीडमध्ये चालवतो की काही सेकंदातच गाडी दिसेनाशी होती.

हे जोडपे मध्य प्रदेशातील शिवपूरीचे रहिवासी असल्याचे समोर येत आहे. पत्नीला अचानक गायब झाल्याचे पाहून पतीने पोलिस स्थानकाला भेट दिली. तिथे हरवल्याची तक्रार त्याने दाखल केली पण खरं प्रकरण तर पुढे जाऊन उलगडलं. पत्नीचा शोध घेण्यासाठी आणि लग्नानंतर लगेचच ही घटना का व कशी घडली, हे निश्चित करण्यासाठी पोलीसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाइल लोकेशन डेटाची तपासणी करायला सुरुवात केली. या तपासात उघड झाले की, नववधू हरवली नाही तर प्रियकरासोबत पळून गेली आहे.

 

 

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close