क्राइम

कुटुंबियांशी लपून केले रजिस्टर लग्न ; नोकरी लागतच लग्नास नकार 

Spread the love
 पुणे / प्रतिनिधी
कुटुंबीयांना.अंधारात ठेवून प्रेमसंबंध असलेल्या तरुणीसोबत नोंदणी पद्धतीने विवाह करून, काही काळाने तरुणीचा पत्नी म्हणून स्वीकार करण्यास नकार देणाऱ्या पोलिस उपनिरीक्षकावर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित तरुणी अनुसूचित जातीची असल्याने त्याने नकार दिला; तसेच तरुणीला गर्भपात करण्यास भाग पाडले आणि  तरुणीकडून दहा ते १२ लाख रुपये घेऊन परत केलेले नाहीत, असे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी एका २८ वर्षाच्या तरुणीने विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दिली. फलटण येथील गोखली गावातील ३२ वर्षीय तरुणासह त्याचा भाऊ आणि वडील यांच्यावर या प्रकरणी अट्रॉसिटी कायद्यांसह भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ३० सप्टेंबर २०२० ते २०२५ या काळात झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी तरुण नुकताच पोलिस उपनिरीक्षक झाला आहे. तो पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होता. त्या वेळी त्याची आणि तक्रारदार तरुणीची ओळख झाली होती. ओळखीचे प्रेमात रूपांतर झाले. आरोपीने तरुणीशी नोंदणी पद्धतीने लग्न केले. मात्र,
त्याबद्दल त्याने कुटुंबीय आणि मित्र
परिवारात सांगितले नाही; तसेच तिला
समाजात पत्नी म्हणून ओळख दिली.
‘तुझ्या जातीमुळे घरचे स्वीकारणार नाहीत’
आरोपीची उपनिरीक्षकपदी निवड झाल्यावर तरुणीने लग्नाबाबत कुटुंबीयांना सांगण्याची विनंती केली. तेव्हा आरोपीने टाळाटाळ केली. ‘घरचे माझ्यासाठी स्थळ पाहत आहेत. तुझ्या जातीमुळे माझ्या घरचे तुझा स्वीकार करणार नाहीत. त्यांना आपले लग्न मान्य होणार नाही. तू माझा विचार विचार सोडून दे, असे म्हणत आरोपी ‘तुझ्या जातीमुळे घरचे स्वीकारणार नाहीत’तक्रारदार तरुणीपासून दूर राहू लागला. यानंतर तरुणीने पोलिसांत धाव घेऊन तक्रार दिली.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
2
+1
1
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close