अरे हे काय गांधीजी रस्त्यावर सुसाट ? समोर गांधीजी आणि मागे पोलीस

नवी दिल्ली / विशेष प्रतिनिधी
सध्या देशात ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे. CJP कडून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याला घेऊन जंतर मंतर वर आंदोलन पुकारण्यात आले आहे.पण या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.त्यामुळे जंतरमंतर वर येणाऱ्या लोकांना पोलिसांकडून पकडण्यात येत आहे. या आंदोलनात एक व्यक्ती गांधीजी ची वेशभूषा करून आला होता. त्याला पकडण्यासाठी पोलिस येताच त्याने भीतीने पळ काढला. त्यामुळे पोलिस त्याला पकडण्यासाठी त्याच्या मागे धावले. तो तरुण पुढे पुढे आणि पोलिस मागेमागे असा सीन होता. रस्त्याने जाणाऱ्या लोकांनी जेव्हा हा सीन बघितला तेव्हा त्यांच्या तोंडातून अरे गांधीजी का पळताहेत असे वाक्य निघत होते.
व्हिडीओमध्ये पांढरं धोतर परिधान केलेला, चष्मा लावलेला आणि हातात काठी घेतलेला एक जण पळताना दिसतो. महात्मा गांधींच्या वेशात तो आंदोलनात सहभागी होण्यासाठी आला होता. तितक्यात दिल्ली पोलीस दलातील कर्मचारी त्याच्यासह आंदोलकांच्या मागे लागले. पोलीस धरपकड करत असल्याचं लक्षात येताच गांधींच्या वेशातील व्यक्ती सुसाट धावत सुटला. त्याला पाहून, अरे गांधीजी कुठे पळताहेत, असा प्रश्न एकाला पडला. तो प्रश्न त्याच्या तोंडून बाहेर पडला आणि व्हिडीओत ऐकू आला.
पळता पळता हातातील काठी खाली पडली. पण तरीही गांधींच्या वेशातील व्यक्ती पळत राहिली. भागमभाग सिनेमात शोधून दिसावा, असा प्रसंग दिल्लीच्या रस्त्यावर पाहायला मिळाला. त्यामुळेच गांधींच्या वेशात पळणारी व्यक्ती आणि त्याच्या मागे लागलेले पोलीस हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
कॉकरोच जनता पार्टीनं १० ऑक्टोबरला दिल्लीच्या जंतरमंतरवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलनाची घोषणा दिली होती. पण दिल्ली पोलिसांनी सीजेपीच्या आंदोलनाला परवानगी दिली नव्हती. पण तरीही सीजेपी समर्थक मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरण्याची शक्यता लक्षात घेता राजधानीत तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांसोबतच केंद्रीय सुरक्षा दलांचे जवान तैनात केले गेले. आंदोलनासाठी आलेल्या तब्बल ७ हजार जणांची धरपकड करण्यात आली.




