क्राइम

दारू सोडायला गेलेल्या युवकांनी कायमचे सोडले जग

Spread the love

चंद्रपूर / नवप्रहार डेस्क 

                             दारू सोडवण्यासाठी गेलेल्या दोन युवकांनी हे जग कायमचे सोडले आहे. एका महाराजा कडून घेतलेले औषध घेतल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.तर दोघांची प्रकृती गंभीर आहे. सहयोग सदाशिव जीवतोडे (वय 19), प्रतीक घनश्याम दडमल (वय 26) अशी मृतकांची नावे आहेत.

सदाशिव पुंजाराम जीवतोडे (वय 45) व सोमेश्वर उद्धव वाकडे (वय 35) या दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांनी आरोपी महाराजाला ताब्यात घेतलं आहे. सहयोग सदाशिव जीवतोडे व प्रतीक घनश्याम दडमल हे गुळगावमधील दोन तरुण वर्धा जिल्ह्यातील शेडगावमध्ये दारू सोडवण्याचा दावा करणाऱ्या महाराजांकडे गेले होते. त्यांनी काल (21 मे) औषध घेतले होते. दारु सोडवण्यासाठी दिलेलं औषध प्राशन केल्यानंतर काल रात्री उशिरा त्या दोघांचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा भद्रावती पोलिस तपास करत आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
2
+1
1
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close