राज्य

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचेवर महिलेने केला गंभीर आरोप 

Spread the love

                मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आंदोलनात सहभागी असलेल्या महिलेने जरांगे यांचेवर गंभीर आरोप केला आहे. यामुळे मराठा आंदोलकांत खळबळ माजली आहे. ललिता तारख असं त्या महिलेचे नाव आहे. तिने मागे जरांगे यांचे उपोषण सोडवले होते.

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाला सुरुवात केली होती. त्यानंतर आपण मुंबईला जाणार असल्याची घोषणा देखील त्यांच्याकडून करण्यात आली. मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेनं निघाले देखील, परंतु त्यांनी मुंबईच्या वाटेवर असतानाच मध्येच आपलं उपोषण स्थगित केलं.

त्यांनी आपल्या मागण्या माण्य करण्यासाठी सरकारला आता तीन महिन्यांचा वेळ दिला आहे. परंतु त्यानंतर आता अंतरवाली सराटीमध्ये घडामोडींना वेग आला आहे. अंतरवाली सराटीमधील ग्रामस्थांनी आणि सरपंचांनी मोठा निर्णय घेतला आहे. अंतरवाली सराटी येथील मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा मंडप हटवण्यात आला आहे. तसचे उपोषणासाठी तयार करण्यात आलेलं व्यासपीठ देखील हटवण्यात आलं आहे.

 

दरम्यान एकीकडे हे सर्व सुरू असतानाच आता दुसरीकडे एका महिलेकडून मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या आरोपांमुळे मोठी खळबळ उडाली आहे. ललिता तारख असं या महिलेचं नाव आहे. ललिता तारख या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात देखील सक्रिय होत्या. मात्र त्यांनी आता मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

नेमकं काय म्हणाल्या ललिता तारख?

मनोज जरांगे यांनी आमच्या गावाला खोटं आश्वासन देऊन माता माऊल्यांना फसवले. तुमच्या उपोषणाची मी साक्षीदार आहे, तुम्ही कसे उपोषण केलं हे मी वेळ आल्यावर सांगेन. जरांगे यांनी भावनिक करून महिलांचा वापर केला. मनोज जरांगे यांचे चौथे उपोषण मी सोडले. रात्रंदिवस आम्ही आंदोलनासाठी झटत होतो. अंतरवाली सराटीमध्ये एक देखील कुणबी सर्टिफिकेट मिळाले नाही, हैदराबाद गॅझेटमधून आम्ही दहा महिन्यांपूर्वी अर्ज केला आहे. जरांगे यांनी आमच्या गावाला खोटं आश्वासन देऊन माता माऊल्यांना फसवले, असे आरोप ललिता तारख यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर केले आहेत.

दरम्यान पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, अंतरवाली सराटीमध्ये एकही कुणबी नोंद सापडलेली नाहीये, मनोज जरांगे यांनी हैदराबाद गॅझेटीयरनुसार आरक्षण भेटेल असं आश्वासन आम्हाला दिलं होतं. यापूर्वी आम्ही मंडप काढू नये म्हणून पोलिसांना विरोध केला होता. उपोषण केल्यावर माणूस दोन दिवस देखील राहू शकत नाही. तुमच्या उपोषणाची मी साक्षीदार आहे, तुम्ही कसे उपोषण केलं हे मी वेळ आल्यावर सांगेन, उपोषण स्थळावरून शिव्या देणे योग्य नाही, छत्रपती शिवराय 18 पगड जातींना घेऊन चालणारे होते, जिल्हाधिकाऱ्यांबद्दल जी भाषा वापरली गेली, ती योग्य नव्हती, असंही यावेळी तारख यांनी म्हटलं आहे.

 

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close