राज्य

हिदा खान ला मदत करणाऱ्या नगरसेवकाचे पाय आणखी खोलात

Spread the love
 प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर

                            TCS धर्मांतरण आणि लैंगिक अत्याचार  प्रकरणात आरोपी हिदा खान हिला आश्रय दिल्या प्रकरणी एमआयएम चे नगर सेवक मतीन पटेल यांचा पाय आणखी खोलात गेला आहे. यांच्यावरील कारवाईचा फास आणखी आवळला जातोय पोलिसांनी निदा खानला अटक केलीय.

छत्रपती संभाजीनगरातील एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेलवर निदा खानला आश्रय दिल्याचा आरोप आहे. याच सर्व प्रकरणावरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. मतीन पटेल च्या मोबाईल मध्ये महिलांचे 30 अश्लील चित्रीकरणाचे व्हिडिओ असल्याचा आरोप उपमहापौरांनी केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

महानगरपालिकेने त्यांच्या घर आणि कार्यालयावर अनधिकृत बांधकामाची नोटीस बजावत पाडकामाचा इशारा दिलाय. उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी मतीन पटेल यांच्या मोबाईलमध्ये महिलांचे अश्लील व्हिडिओ असल्याचा आणि ब्लॅकमेलिंगचा गंभीर आरोप केला आहे. तसेच आगामी महासभेत त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. मतीन पटेल फक्त मोहरा असून यामागे मोठं जाळं कार्यरत आहे, असा गंभीर इशाराही जंजाळ यांनी दिलाय.

खुलासा न केल्यास घर पाडण्यात येणार


मतीन पटेल याना छत्रपती संभाजी नगर महापालिकेने दणका दिला आहे. त्यांच्या घरावर आता बुलडोझर कारवाई करण्यात येणार आहे. ज्या घरात निदा लपलेली होती ते घर बेकायदेशीर अतिक्रमण करून बांधलं असल्याची नोटीस माहापालिकेकडून देण्यात आलीय. 3 दिवसात खुलासा न केल्यास घर पाडण्यात येईल असा इशारा देखील महापालिकेकडून देण्यात आलाय. त्याचबरोबर त्यांचं नारेगाव परिसरातील दुसरं राहते घर आणि नारेगाव परिसरातील त्यांच्या ऑफिसला ही अतिक्रमण केल्या संदर्भातली नोटीस बजावण्यात आली आहे.

धर्मांतरण प्रकरणी निदा खानच्या चौकशीत अनेक बाबी समोर


निदा खानला आश्रय दिल्याप्रकरणी छत्रपती संभाजीनगरातील एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेलला पोलिसांनी सहआरोपी केलं आहे. जवळपास महिनाभरानंतर निदा खानला पोलिसांनी अटक केली. नाशिकमधील टीसीएस प्रकरणातील धर्मांतरण प्रकरणी निदा खानच्या चौकशीत अनेक बाबी समोर येणार आहेत. त्याचसोबत महिन्याभराच्या काळात तिला कुणी आश्रय दिला याचाही उलगडा होण्याची शक्यता आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close