क्राइम

आई वडील आणि भावाने तरुणाला संपवले

Spread the love
पुणे / विशेष प्रतिनिधी
         येथील जोगवडी येथे आई ,वडील आणि भावाने मिळून तरुणाला संपवल्याचा प्रकार उघड झाला आहे. शेतीच्या वादावरून उद्भवलेल्या वादातून ही घटना घडल्याचे सांगितल्या जात आहे.  या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी मृताचे वडील, सावत्र आई आणि सावत्र भावाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
सुरज संजय गुळुमकर असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. ८ मे २०२६ रोजी रात्री जोगवडी येथील घराशेजारील बाथरूमसमोरील मोकळ्या जागेत सुरजचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. अज्ञात हत्याराने त्याच्या डोक्यात वार करून त्याची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती.
कौटुंबिक वादाचा रक्तरंजित शेवट
फिर्यादी जीवन संपत पोमण (रा. पिंपळे, ता. पुरंदर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सुरजचे त्याच्या वडिलांशी आणि सावत्र आई-भावाशी जमीन वाटपावरून जुने वाद सुरू होते. याच वादातून आणि पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून वडील संजय धोंडीबा गुळुमकर, सावत्र आई माया आणि सावत्र भाऊ अथर्व यांनी संगनमताने सुरजचा काटा काढल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच वडगाव निंबाळकर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. याप्रकरणी तिन्ही आरोपींविरुद्ध भादंवि कलम ३०२ (खून) आणि अन्य संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमिनीच्या एका तुकड्यासाठी जन्मदात्या वडिलांनीच मुलाचा जीव घेतल्याच्या या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close