विशेष

तरुणाचा मुक्का आणि बिबट्याला धक्का

Spread the love

अंगावर हल्ला करणाऱ्या तरुणाने बिबट्याला पळवून लावले 

राहता/ विशेष प्रतिनिधी 

समोर बिबट्या सारखा हिंस्त्र प्राणी दिसला की कोणाचीही पँट समोरून ओली आणि मागून पिवळी झाल्याशिवाय राहत नाही. हा सगळा प्रकार या प्राण्याला समोर बघितल्यावर होतो. आणि तो जर अंगावर धावून आला तर काय गत होत असेल. पण एका तरुणाने अंगावर धावत आलेल्या बिबट्याला एकाच ठोस्याने पळवून लावले आहे. या तरुणाच्या हिमतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

राहाता तालुक्यातील साकुरी गावात लक्ष्मण रोहम यांची द्राक्षाची बाग आहे. शेतीची देखरेख करण्यासाठी शेतमजूर रमेश पवार हा युवक आपल्या कुटुंबासह तिथे राहतो. रात्रीच्या सुमारास रमेश पवार लघुशंकेसाठी घराबाहेर आला असता, अंधारात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर अचानक हल्ला चढवला.

रमेश याने प्रसंगावधान राखत एका हाताने बिबट्याचा पाय पकडला आणि दुसऱ्या हाताने त्याच्या छातीवर जोरदार फाईट मारली. जोरदार दणका बसताच बिबट्याने तेथून धूम ठोकली. या झटापटीत रमेश पवार याच्या खांद्याला बिबट्याच्या बिबट्याच्या नखांचे ओरखडे पडले आहेत. रमेश पवार याने दाखवलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे..

गेल्या काही दिवसांपासून साकुरी परिसरात बिबट्यांचा मुक्त संचार वाढला आहे.. वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्याला देखील बिबट्या हुलकावणी देत असल्याचे मोबाईल कॅमेऱ्यात कैद झालं आहे. बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close