क्राइम

नवरा अन्य पुरुषांसोबत सबंध ठेवण्यासाठी टाकत होता दबाब

Spread the love
 
लहान बहिणीचे भाऊजीवर गंभीर आरोप
 
हरियाणा / विशेष प्रतिनिधी 
                 पाण्याच्या टाकीत आढळलेल्या मेघा शर्मा मृत्यूला घेऊन तिच्या लहान बहिणीने आपल्या भाऊजीवर गंभीर आरोप केले आहे. तिच्या मते बहिणीचा नवरा तिला मोबाईल मध्ये अन्य तरुणीचे अश्लील व्हिडिओ दाखवून तिच्यावर अन्य पुरुषांसोबत सबंध ठेवण्यास दबाब टाकत होता. आणि तिला पैशे कमावून आण असे धमकावत होता.या गोष्टीला विरोध केल्यावर तो तिला मारहाण करून मानसिक त्रास देत असे. या नव्या आरोपांनंतर पोलिसांनी दाखल गुन्ह्याचा तपास वेगवान केला आहे. दुसरीकडे, धीरजच्या गावातील ग्रामस्थांनी मंगळवारी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन हे सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगत निष्पक्ष तपासाची मागणी केली आहे.

इतर पुरुषांशी संबंध ठेव आणि पैसे मिळव

रजनीने दिलेल्या माहितीनुसार, 20 एप्रिल रोजी मेघाचा विवाह हरियाणातील जोरासी येथील रहिवासी आणि मानेसरमधील एका खाजगी कंपनीत कार्यरत असलेल्या धीरजसोबत झाला होता. लग्नानंतर लगेचच मेघाने सासरच्या छळाबाबत आपल्या कुटुंबाला सांगण्यास सुरुवात केली होती. पती तिच्यात लहान-सहान त्रुटी काढून तिचा अपमान करायचा. घटनेच्या आदल्या दिवशी धीरज मेघाला तिच्या माहेरी सोडून गेला होता. रविवारी रात्री दोन्ही बहिणी एकत्र झोपल्या असताना मेघाने सांगितले की, पती इतर स्त्रियांच्या संपर्कात असल्याचे सांगून तिलाही अश्लील व्हिडिओ दाखवून तसे करण्यास व पैसे कमावण्यास सांगायचा. तसेच तो वारंवार पैशांची मागणी करायचा आणि ती सुंदर नाही म्हणून तिची हेटाळणी करायचा.

एमएस्सी बीएड आणि नोकरीचं स्वप्न

मेघाने एम.एससी आणि बी.एड पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले असून तिला नोकरी करून स्वतःचे करिअर घडवायचे होते. परंतु लग्नानंतर सततच्या मानसिक छळ आणि तणावामुळे ती आतून पूर्णपणे खचली होती. सोमवारी सकाळी मेघाचा मृतदेह तिच्या माहेरी असलेल्या पाण्याच्या टाकीत आढळून आला. याप्रकरणी मृत मुलगी मेघाचे वडील लालाराम यांच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात पती धीरजविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीतील सर्व गंभीर आरोपांची कसून चौकशी सुरू असून समोर येणाऱ्या तथ्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

ग्रामस्थांनी गाठलं पोलीस स्टेशन

 

दरम्यान, मंगळवारी जोरासी गावातील ग्रामस्थांनी पोलीस अधीक्षक दीपक कुमार यांची भेट घेऊन आपले म्हणणे मांडले. घटनेच्या रात्री धीरजने पत्नीशी फोनवर संवाद साधला होता आणि ही आत्महत्या सासरी नसून मेघाच्या माहेरी झाली आहे, त्यामुळे या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. यावर पोलीस अधीक्षकांनी ग्रामस्थांना आश्वस्त केले की, तपास पूर्णपणे निष्पक्ष पद्धतीने केला जाईल आणि कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close