विशेष

बिबट्याचा महिलेवर हल्ला, महिलेची कडवी झुंज, अखेर बिंबट्याने ठोकली धूम 

Spread the love

बुलढाणा /विशेष प्रतिनिधी 

               कमी होत चाललेल्या जंगलामुळे वन्य प्राण्यांच्या आदिवासाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. तसेच वन्यप्राण्यांच्या अधिवासात मानवी हस्तक्षेप वाढल्याने वन्य प्राणी ज्यात हिंस्त्र वन्य प्राण्यांचा देखील समावेश आहे मानवी वस्तीत घुसत आहे. शेतात सोयाबीन सोंगत असलेल्या महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील थळ शेतशिवारात घडली आहे. 

या हल्ल्यात सुनीता प्रकाश कुसळकर (रा. थड, तालुका मोताळा ) या जखमी झाल्या. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून बुलढाणा येथील शासकीय महाविद्यालय आणि जिल्हा सामान्य पुढील उपचारासाठी हलविण्यात आले. त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय सूत्रांनी सांगितले.

महिलेचा प्रतिकार, युवकांचे धाडस

मिळालेल्या माहितीनुसार, सुनीता कुसळकर या थड गाव शिवारातील गट क्रमांक ४३ मधील एका शेतात सोयाबीनची सोंगणी करत होत्या. त्याचवेळी अचानक बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. हल्ल्यात जखमी झाल्यानंतरही त्यांनी असामान्य धाडस दाखवून हातातील विळ्याने बिबट्याचा चिवट प्रतिकार केला. दरम्यान, शेताच्या जवळच बांधावर बकऱ्या चारत असलेल्या काही युवकांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरडाओरड केल्याने बिबट्याने तेथून पळ काढला. त्यानंतर उपस्थितांनी जखमी सुनीता कुसळकर यांना प्राथमिक उपचारानंतर तातडीने बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले.

ग्रामस्थ भयभीत

घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या घटनेमुळे थड परिसरातील रहिवासी शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.जखमी महिलेस तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी, तसेच शेतात काम करणाऱ्या शेतकरी व शेतमजुरांच्या सुरक्षिततेसाठी बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थ व शेतकऱ्यातून होत आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close