हटके

सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय मगरी चा आणि  लहान मुलाचा  व्हीडीओ

Spread the love

नवी दिल्ली / नवप्रहार न्यूज नेटवर्क

                      जगात काही प्राण्यांची गणना अत्यंत हिंस्रक प्राण्यात होते. हे प्राणी इतके भयानक असतात की क्षणात मनुष्याला गिळंकृत करतात. मगरी ची गणना देखील हिंस्रक प्राण्यात होते. मगरी ही उभयचर प्राणी आहे. म्हणजे ती जमिनीवर आणि पाण्यातही राहू शकते. पण पाण्यात असतांना ती जास्त शक्तिशाली असते. अश्या हिंस्रक प्राण्यांशी मैत्री हा विचारच अंगावर शहारे आणतो. पण काही लोक तो ही प्रकार करतात. तरुण किंवा वयस्कर व्यक्तीचे ठीक परंतु एखादा लहान मुलगा मगरी सारख्या प्राण्यांशी मैत्री करत असेल तर. सध्या सोशल मीडियावर लहान मुलगा आणि मगरी चा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात एक मुलगा मगरीला खांद्यावर घेऊन जाताना दिसत आहे. 

. असं दृश्य तुम्ही कधीही पाहिलं नसेल. या व्हिडिओमध्ये एक लहान मूल एका धोकादायक मगरीला पाठीवर घेऊन जाताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, मुलाने मगरीला पाठीवर घेतलं आहे आणि तिचे पुढचे दोन्ही पाय पकडले आहेत.

तो मगरीला अशा प्रकारे घेऊन जात आहेत जणू एखादा बाप आपल्या मुलाला त्याच्या पाठीवर घेऊन फिरायला जात आहे. आश्‍चर्यकारक गोष्ट म्हणजे तो धोकादायक प्राण्याला पाठीवर घेऊन चालला असतानाही त्याला अजिबात भीती वाटत नाही. गमतीची गोष्ट म्हणजे मुलगा मगरीला घेऊन जात असताना काही लोक आपल्या घरात बसून बघतात आणि हसायला लागतात. कदाचित ही घटना त्या ठिकाणासाठी सामान्य असेल, परंतु प्रत्यक्षात ते एक थरारक दृश्य आहे.

 

 

हा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर @FunnyVideosID नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. अवघ्या 8 सेकंदांचा हा व्हिडिओ 3 लाख 74 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर 14 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईकही केलं आहे. त्याचवेळी मगरीचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने गंमतीत लिहिलं आहे की, ‘तो नक्कीच नेता बनेल’, तर दुसऱ्या यूजरने ‘मगरीने मुलासमोर शरणागती पत्करली’ असं लिहिलं आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close