हटके

घरातुन आला जबरदस्त आवाज;  जाऊन पाहताच सगळेच हादरले

Spread the love

कलबुरगी (कर्नाटक ) / विशेष प्रतिनिधी

                     सकाळची वेळ असल्याने तशी परिसरात शांतता होती. काही नागरिक आपल्या दैनंदिन दिनचर्येत गुंतले होते. इतक्यात भयंकर आवाज झाला. स्फोट व्हावा असा तो आवाज होता. सिलेंडर तर फाटला नसावा अशी अनेकांना शंका होती.  नेमके काय झाले हे पाहण्यासाठी नागरिक घराबाहेर पडले समोरचे दृश्य पाहून सगळेच हादरले. कारण एका घराच्या भिंती पडल्या होत्या. हवेत धुळीचे लोट पसरले होते. समोरचे दृश्य पाहून उपस्थित सगळेच हादरले.

नेमकं प्रकरण काय?

कर्नाटकच्या कलबुरगी जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली. पुण्याच्या एका दगड खाणीत काम करणाऱ्या ४९ वर्षांच्या शिवलाल बळीराम राठोडचे पत्नी सवितासोबत वाद सुरू होता. या घरगुती भांडणांमुळे त्रस्त होऊन सविता आपल्या १५ वर्षांची मुलगी वीरा आणि १९ वर्षांचा मुलगा प्रकाश यांना सोबत घेऊन नातेवाईकांकडे निघून आली होती.

पत्नी आणि मुले घर सोडून गेल्याच्या रागातून शिवलाल मंगळवारी सकाळी थेट नातेवाईकांच्या घरी पोहोचला. खाणीत काम करत असल्यामुळे त्याला दगड फोडण्याच्या स्फोटकांचा अंदाज होता आणि तिथे त्याची थेट पोहोचही होती. तो पुण्याहून सोबत अत्यंत घातक स्फोटके घेऊन आला होता.

नातेवाईकांच्या घरात शिरताच पुन्हा वाद सुरू झाला. पण यावेळी शिवलालच्या डोक्यात वेगळाच विचार होता. त्याने कोणाला काही समजायच्या आत घराचा दरवाजा आतून घट्ट बंद करून घेतला.घरात पत्नी, मुलगी, मुलगा आणि नातेवाईक उपस्थित असताना शिवलालने स्वतःच्या कमरेला बांधलेली स्फोटके उडवून दिली.अन् एका क्षणात सगळं संपलं…

हा स्फोट इतका भीषण होता की शिवलाल राठोड आणि त्याची १५ वर्षांची मुलगी वीरा यांचा जागीच मृत्यू झाला. स्फोटाच्या तीव्रतेने घराच्या भिंती कोसळल्या आणि आसपासच्या घरांनाही हादरे बसले. या घटनेत शिवलालची पत्नी सविता (वय ४०), मुलगा प्रकाश (वय १९), नातेवाईक सुरेखा चव्हाण (वय ३०), तिचा मुलगा विवेक चव्हाण (वय १२) आणि नितेश हे गंभीर जखमी झाले.

उडालेल्या दगडांमुळे शेजारचे दोन नागरिकही किरकोळ जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. जखमींवर सध्या कलबुरगी जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. खाणीतून ही घातक स्फोटके बाहेर कशी आणली गेली, यामागे आणखी काय कारणे होती आणि संपूर्ण घटनेचा अधिक तपास आता पोलीस करत आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close