क्राइम

तरुणाला धावत्या लोकल मधून ढकलले, मृत्यू 

Spread the love
मुंबई / विशेष प्रतिनिधी
                धावत्या लोकलमधून एका तरुणाला ढकलून दिल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. पोलिसांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
मिळालेल्या माहितीनुसार, चर्चगेट-बोरिवली लोकलमध्ये आज दुपारच्या सुमारास भयंकर घटना घडली. एका व्यक्तीला धावत्या लोकलमधून ढकलून देण्यात आले. वांद्रे खाडीवर लोकल आली असताना ही घटना घडली. अपंगांच्या डब्यात हा तरुण प्रवासी चढला होता. यावेळी प्रवाशांमध्ये किरकोळ वाद झाला आणि या वादातून हा भयानक प्रकार घडला. त्या प्रवाशाने तरुणाला धावत्या ट्रेनमधून धक्का दिला. त्यामुळे तरुण वांद्रे खाडी पुलावर पडला.
धावत्या लोकलमधून खाली पडल्यामुळे तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. जखमी तरुणाला तात्काळ वांद्रे येथील भाभा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. तरुणाची प्रकृती चिंताजनक होती. पण रुग्णालयात पोहचेपर्यंत त्याचे प्राण गेले. उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या घटनेमुळे वांद्र्यात एकच खळबळ उडाली. धक्का देणाऱ्या व्यक्तीला वांद्रे लोहमार्ग पोलिसांनी ताब्यात घेतले.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close