क्राइम

पतीच्या आत्महत्ये साठी प्रियकराला दोषी ठरवणारी पत्नीच निघाली खुनी 

Spread the love

भोकरदन / विशेष प्रतिनिधी

                     पतीच्या आत्महत्येसाठी प्रियकराला जबाबदार ठरवणारी पत्नीच पतीच्या आत्महत्येस जबाबदार असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. ही घटना जालन्यातील भोकरदन तालुक्यातील अलापूर येथे समोर आली आहे.

अलापूर येथील कैलास विश्वनाथ मिरकर (वय ४५) यांनी ३० ते ३१ जुलै २०२६ दरम्यान आपल्या शेतात विषारी औषध प्राशन करून जीवन संपवले होते. या प्रकरणी सुरुवातीला पत्नी अनिता मिरकर हिच्या तक्रारीवरून साबेर शाह सादिक शाह याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

भोकरदन पोलिसांचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शेळके यांनी या प्रकरणाचा तपास करत मृत कैलास यांच्या नातेवाईकांचे जबाब नोंदवले. त्यानंतर संशयितांच्या मोबाईल फोनचे कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) तपासले असता अनिता मिरकर आणि साबेर शाह यांच्यातील अनैतिक संबंध उघड झाले. पत्नी आणि तिच्या प्रियकराकडून मिळणाऱ्या सततच्या मानसिक त्रासाला कंटाळूनच कैलास यांनी आत्महत्या केल्याचे पोलिसांच्या डिजिटल तपासात निष्पन्न झाले.

तपासाची दिशा बदलल्यानंतर पोलिसांनी तक्रारदार असलेल्या अनिता मिरकर हिलाच या प्रकरणात सहआरोपी केले. २० ऑगस्ट रोजी तिला अटक करून न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने तिची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. पतीच्या मृत्यूनंतर पत्नीनेच रचलेला कट सी.डी.आर. तपासामुळे उघडकीस आला असून, या प्रकरणातील फरार आरोपी प्रियकराचा भोकरदन पोलीस शोध घेत आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close