जागतिक

मालवाहू जहाज बुडाले,  24 स्क्रू मेंबर पैकी चार लोकांना वाचविण्यात यश,  तर 20 बेपत्ता

Spread the love

नवी दिल्ली / विशेष प्रतिनिधी 

             पनामा ध्वज असलेले एक मलावे जहाज बंगालच्या उपसागरात बुडाले आहे.  हे जहाज ओडिशातील पारादीप किनाऱ्यापासून सुमारे 240 नॉटिकल मैल अंतरावर बुडाले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जहाजावर एकूण 24 क्रू मेंबर्स होते. यातील चार लोकांना वाचविण्यात यश आले आहे.तर 20 जण अजूनही बेपत्ता आहेत.त्यांचा युद्धपातळीवर शोध सुरू आहे.

हे मालवाहू जहाज ओडिशातून लोहखनिज घेऊन सिंगापूरच्या दिशेने जात होते. 20 ऑगस्ट रोजी जहाज पारादीप बंदरात दाखल झाले होते. त्यानंतर पुढील प्रवासासाठी ते रवाना झाले होते. मात्र बंगालच्या उपसागरात पोहोचल्यानंतर जहाज बुडाले.

भारतीय तटरक्षक दल आणि नौदलाचे बचावकार्य सुरू

जहाज बुडाल्याची माहिती मिळताच भारतीय तटरक्षक दल आणि भारतीय नौदलाने शोध आणि बचाव मोहीम सुरू केली आहे. परिसरातून जाणाऱ्या इतर जहाजांनाही सतर्क करण्यात आले असून बचावकार्यात मदत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जहाजावरील 24 क्रू मेंबर्सपैकी 4 जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. तर 20 जण अद्यापही बेपत्ता आहेत.  याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही. अधिकारी घटनास्थळी बचावकार्य आणि शोधमोहीम राबवत आहेत.

बहुतांश क्रू मेंबर्स चिनी नागरिक

एका वरिष्ठ IPS अधिकाऱ्याने सांगितले की, जहाजावरील किती क्रू मेंबर्सची सुटका झाली आहे याची माहिती अद्याप निश्चित झालेली नाही. क्रू मेंबर्सपैकी किती जणांची सुटका झाली आहे, याबाबत आम्हाला अद्याप खात्री नाही. जहाजावरील बहुतांश क्रू मेंबर्स चिनी नागरिक असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

ओडिशाच्या किनाऱ्यावरून निघाले होते जहाज

हे जहाज शुक्रवारी ओडिशाच्या किनाऱ्यावरून रवाना झाले होते. त्यानंतर बंगालच्या उपसागरात त्याचा अपघात झाला आणि जहाज समुद्रात बुडाले. हे जहाज जगतीसिंगपूर जिल्ह्यातील पारादीप किनाऱ्यापासून सुमारे 444 किलोमीटर अंतरावर बुडाले असल्याचे सांगण्यात आले आहे.

जहाज कशामुळे बुडाले?

जहाज नेमके कोणत्या कारणामुळे बुडाले याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तसेच जहाजावरील सर्व क्रू मेंबर्सची सद्यस्थिती काय आहे, याबाबतही माहिती मिळणे बाकी आहे. भारतीय तटरक्षक दल आणि नौदलाकडून बचावकार्य सुरू असून परिसरातील इतर जहाजांनाही या मोहिमेत मदत करण्यास सांगण्यात आले आहे. क्रू मेंबर्सची संख्या, किती जणांची सुटका झाली आणि जहाज बुडण्यामागचे नेमके कारण याबाबत अधिक माहिती बचावकार्य पुढे गेल्यानंतर समोर येण्याची शक्यता आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close