दर्यापुर— अंजनगाव सुर्जी तालुक्यातील वादळी पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानाचे लवकरात लवकर पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी- सौ प्रांजली कैलास कुलट
दर्यापूर / प्रतिनिधी
दर्यापुर विधानसभाप्रमुख युवासेना युवती यांची मागणी.
दर्यापुर — दर्यापुर—अंजनगाव सुर्जी तालुक्यात गेल्या ८ दिवसापासुन दररोज वादळी वार्यासह अवकाळी पावसामुळे शेतकर्याचे मोठे नुकसान झाले आहे.दर्यापुर —अंजनगाव सुर्जी तालुक्यातील बागाईतदार गावामध्ये गहु,कांदा,उन्हाळी ज्वारी व संञा,केळी फळबाग यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकर्यांनी गहु सोंगला आहे सोंगुन पडला आहे.किंवा वार्यामुळे खाली पडला आहे.कांदा जवणीत आहे.त्या पाण्यामुळे जवणीत सडला आहे.फळबाग यांचे सुध्दा वार्यामुळे नुकसान झाले आहे शेतकरी हवाल दिल झाला आहे. त्यामुळे शेतकर्यांना मान्सुन पुर्व शेतीची मशागत करावयाची आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करुन नुकसान भरपाई लवकर मिळावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे सौ प्रांजली कैलास कुलट दर्यापुर विधानसभाप्रमुख युवासेना युवती यांनी निवेदानाव्दारे केली आहे.