सामाजिक

सोशल मीडियावरची मैत्री पडली महागात , अल्पवयीन मुलीने घेतली तलावात उडी 

Spread the love

तिच्या पाठोपाठ मित्राचीही उडी आणि दोघांचा करून अंत 

सावंतवाडी / विशेष प्रतिनिधी 

                मागील तीन वर्षापासून त्यांची सोशल मीडियावर मैत्री होती. त्यांच्यात मोबाईल वर बोलणे चालायचे. तिचे १० विचे वर्ष असल्याने पालकांनी तिला मोबाईल चा वापर कमी करून अभ्यासावर लक्ष केंद्रित करायला सांगितले होते. पण तिचा मित्र तिला सारखे कॉल आणि मॅसेज करून त्रास देत असल्याने तिने त्याचा नंबर ब्लॉक केला होता. तिच्याशी संपर्क होत नसल्याने ती पुरता चिडला होता. त्याने सरळ तिच्याशी भेट घेण्यासाठी मुंबई वरून सावंतवाडी येथे आला. भेटी दरम्यान त्यांच्यात वाद झाला. याच वादातून तिने थेट तलावात उडी घेतली. तिच्या पाठोपाठ त्याने देखील उडी घेतली. दोघांनाही पोहता येत नसल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला.

लिशा भिकाजी गोसावी ( १६ रा. कारिवडे गोसावीवाडी, सावंतवाडी) आणि २४ वर्षीय रोहन विजय गोसावी (मूळ रा. कासार्डे, कणकवली

​​सदर प्रकरणातील पोलिसांचा प्राथमिक तपास, प्रत्यक्षदर्शींचा जबाब आणि सीसीटीव्ही फुटेजमधून काही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. दहावीत शिकत असलेल्या लिशा हिला रोहन हा सतत त्रास देत असल्याने व भेटायला आल्यानंतर त्याच्यासोबत झालेल्या वादानंतरच तिने आत्महत्या सारखे भयंकर पाऊल उचलले असावे असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. पोलिसांनी दोघांचेही मोबाईल ताब्यात घेतले असून या तपासानंतरच या घटनेमागचे खरे कारण स्पष्ट होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इयत्ता दहावीत शिकणारी १६ वर्षीय लिशा भिकाजी गोसावी (रा. कारिवडे गोसावीवाडी, सावंतवाडी) आणि २४ वर्षीय रोहन विजय गोसावी (मूळ रा. कासार्डे, कणकवली; सध्या रा. सांताक्रुझ, मुंबई) यांच्यात गेल्या तीन वर्षांपासून मैत्री होती. यंदा दहावीचे वर्ष असल्याने लिशाच्या पालकांनी तिला अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले होते. मात्र, रोहनकडून सतत फोन व मेसेजद्वारे होणाऱ्या त्रासाला कंटाळून लिशाने त्याचा नंबर ब्लॉक केला होता. याच रागातून रोहन शनिवारी मुंबईतील नालासोपारा येथून थेट सावंतवाडीत दाखल झाला.

सीसीटीव्ही फुटेजमधील चित्रीकरणानुसार, घटनेच्या दिवशी मोती तलावाकाठी असलेल्या श्रीमंत बापूसाहेब महाराज पुतळ्याच्या मागे लिशा, रोहन आणि लिशाची चुलत बहीण खुशी गोसावी हे तिघे एकत्र आले होते. तेथे रोहन आणि लिशा यांच्यात मोबाईल तपासण्यावरून जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली. रोहनने लिशाचा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला आणि वाद वाढल्याने तिच्यावर हात उचलण्याचाही प्रयत्नही केल्याचे दिसत आहे. यानंतर हा वाद अधिकच वाढत असल्याने खुशी कोणालातरी फोन करत असल्यास तेही दिसत आहे. ती फोन करत असल्याचे पाहून दोघेही तिला थांबवून लिशाने मोबाईल बंद केला आणि तिघेही तेथून निघून गेल्याचे चित्रीकरणात स्पष्टपणे दिसत आहे.

​त्यानंतर काही वेळातच म्हणजे दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास श्रीराम वाचन मंदिर व चिटणीस नाका परिसरातील तलावाच्या काठावर लिशाने रोहनला संपर्क न करण्याची ताकीद दिली आणि अचानक तलावात उडी घेतली. तिला वाचवण्यासाठी सोबत असलेल्या खुशीने आरडाओरडा केल्यावर रोहननेही क्षणाचा विचार न करता पाण्यात उडी मारली. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचाही बुडून मृत्यू झाला. स्थानिक नागरिकांनी प्रथम रोहनचा मृतदेह बाहेर काढला त्यानंतर लिशाचा मृतदेह सापडत नसल्याने सांगेली येथील बाबल आल्मेडा रेस्क्यू टीमच्या मदतीने दुपारी उशीरा तिचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला.

याप्रकरणी खुशी गणपत गोसावी हिच्या फिर्यादीवरून सावंतवाडी पोलिसांनी दोन्ही मृत्यांची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. पोलीस निरीक्षक डॉ. राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खंदरकर आणि पोलीस हवालदार मंगेश शिंगाडे पुढील तपास करत आहेत. घटनेतील दोन्ही मृतकांचे मोबाईल लॉक असल्याने वादाचे मुख्य कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तांत्रिक विश्लेषणाद्वारे हे मोबाईल उघडल्यानंतरच या प्रकरणातील खरा प्रकार उघडकीस येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. तरुण पिढीने कौटुंबिक वा वैयक्तिक समस्या उद्भवल्यास असे टोकाचे पाऊल न उचलता पालक किंवा पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

दरम्यान, या प्रकरणातील मृतदेहांचे शवविच्छेदन झाल्यानंतर शनिवारी प्रथम लिशाचा मृतदेह तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला होता. तर रविवारी रोहन गोसावी या तरुणाचा मृतदेह त्याच्या वडिलांच्या स्वाधीन करण्यात आला. या घटनेचा तपास पोलीस प्रशासन करत असून तपासानंतरच निशा हिच्या आत्महत्येमागचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close