सामाजिक

नेपाळ मध्ये अडकलेल्या नागरिकांसाठी नागपूर आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले माहिती देण्याचे आवाहन

Spread the love
नागपूर /प्रतिनिधी
आज दि. *26.08.2026 रोजी नेपाळ येथे महापूरस्थिती* निर्माण झाल्याचे वृत्त प्राप्त झाले असून, मोठ्या प्रमाणात पर्यटक व नागरिक अडकले असल्याची माहिती आहे. यामध्ये भारतातील तसेच *नागपूर जिल्ह्यातील काही नागरिक/पर्यटक अडकले असण्याची शक्यता आहे.*
*नागपूर जिल्ह्यातील कोणतीही व्यक्ती/पर्यटक नेपाळ येथे अडकलेला असल्यास किंवा आपल्या ओळखीतील, नातेवाईकांपैकी अथवा संबंधित कोणतीही व्यक्ती सदर ठिकाणी अडकलेली असल्याची माहिती असल्यास, सदर व्यक्तीची सविस्तर माहिती तात्काळ जिल्हा प्रशासन, नागपूर यांना कळवावी.*
तसेच, नेपाळ येथे अडकलेल्या प्रवासी/पर्यटकांची माहिती संकलित करण्यासाठी *विशेष ऑनलाइन लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.•* अडकलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांनी अथवा संबंधितांनी खालील लिंकद्वारे संबंधित प्रवाशाची नाव, संपर्क क्रमांक, सद्यस्थिती, नेपाळमधील ठिकाण, सोबत असलेल्या व्यक्तींची माहिती तसेच उपलब्ध इतर आवश्यक तपशील भरून सादर करावेत.
🔗 *अडकलेल्या प्रवासी/पर्यटकांची माहिती भरण्यासाठी ऑनलाइन लिंक:*
*संपर्क*:
*(केवळ नागपूर जिल्हयाकरिता)*
आपत्ती व्यवस्थापन विभाग,
जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर
☎️ दूरध्वनी : *0712-2562668*
📱 मोबाईल : *8860018817*
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close