आरोग्य व सौंदर्य

गर्भाशयाच्या कर्करोगाबाबत महिलांना जागृत करणे गरजेचे-डॉ. गिरीष जतकर

Spread the love

 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कार्यशाळा संपन्न

प्रतिनिधी यवतमाळ

गर्भाशयाच्या कर्करोगाचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यामुळे महिलांनी टेस्टींग करुन घ्यावी. या आजारापासून बचाव करण्यासाठी महिलांना जागृत करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन श्री. वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीष जतकर यांनी केले. ते यवतमाळ येथे गर्भाशयाच्या कर्करोगाबाबत आयोजित कार्यशाळेत बोलत होते.

शासनाच्या निर्देशानुसार जानेवारी महिण्यात कर्करोग जागरुकता महिना सर्वत्र साजरा केला जात आहे. त्या अनुषंगाने यवतमाळ येथील श्री. वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालय येथे डब्लू डी डब्लू यवतमाळने वैद्यकीय महाविद्यालय प्रसुती व स्त्रिरोग विभाग आणि वायओजीएस यांच्या सहकार्याने गर्भाशयाच्या कर्करोग जागरूकता विषयक कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेत वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीष जतकर, वैद्यकीय अधिक्षक डॉ. सुरेंन्द्र भुयार, प्रसूती विभागाच्या प्रमुख डॉ. क्षमा केदार, सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. आर.पी. चव्हाण, वायओजीएसच्या सचिव डॉ. सुषमा तारक, डब्ल्यूडीडब्ल्यू यवतमाळच्या अध्यक्षा डॉ. संगीता आशिष तावडे, सचिव, डॉ. रजनी कांबळे उपस्थित होते. कार्यशाळेत सीनीयर नर्सेस मेट्रन श्रीमती मोरे तसेच त्यांच्या अधिनस्थ असलेला १०० हून अधिक नर्सिंग स्टाफ तसेच पॅरा मेडीकल स्टाफ उपस्थित होता. या कार्यशाळेत गर्भाशयाच्या आणि स्तनाच्या कर्करोगाची पॅथोफिजियोलॉजी या विषयावर डॉ. क्षमा केदार, चाचणी आणि तपासणीचे महत्त्व या विषयी डॉ. संगीता तावडे यांनी तसेच एचपीव्ही लसीकरणाचे महत्त्व या विषयावर डॉ. रजनी कांबळे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन (MOC): डॉ. स्वाती पाटील यांनी केले.

रोज दोनशे मृत्यू

देशात ह्यूमन पॅपिलोमा या व्हायरस मुळे होणा-या गर्भाशय कर्करोगाचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. या आजाराने रोज दोनशे महिलांचा मृत्यू होत आहे. दरवर्षी 1.24 लाख स्त्रियांचे गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे निदान होत आहे. हा आजार प्रथम किंवा व्दितीय स्टेज मध्ये लक्षात येत नाही. त्यामुळे महिलांनी कर्करोगाच्या निदानासाठी उपलब्ध असलेली पॅप टेस्ट करुन घेणे अत्यंत गरजेचे आहे. विशेष म्हणजे या आजाराला प्रतिबंध करणारी एचपीव्ही लस आता यवतमाळात सुध्दा उपलब्ध झाली आहे.

डॉ. संगीता आशिष तावडे
स्त्रिरोग तज्ञ, यवतमाळ

 

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close