क्राइम

कचरा डेपो परिसरात सापडलेल्या मृतदेहाचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश 

Spread the love
पुणे/ विशेष प्रतिनिधी
               केशवनगर येथील कचरा डेपो परिसरात सापडलेल्या मृतदेहाचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. प्रियकर कॅब चालकाने तरुणीचा खून केल्याचे तपासात उघड झाले आहे. अनैतिक सबंध त्यातून झालेली गर्भधारणा आणि पैशाच्या वादातून ही घटना घडली आहे.  आफरीन पठाण (वय २९) असे मृत तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी गोरखनाथ शिंदे या आरोपीला अटक केली आहे.
मैत्री, प्रेम आणि धमकी
ब्युटी पार्लरमध्ये काम करणारी आफरीन रोज कामाला जाण्यासाठी कॅबचा वापर करायची. याच दरम्यान तिची ओळख कॅबचालक गोरखनाथ शिंदे याच्याशी झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि त्यांच्यात शारीरिक संबंध निर्माण झाले. काही महिन्यांपूर्वी आफरीन गर्भवती राहिली. तिने गर्भपातासाठी गोरखनाथकडे १ लाख रुपयांची मागणी केली होती. तसेच, पैसे न दिल्यास “तुझ्या पत्नीला आणि घरच्यांना सर्व सांगते,” अशी धमकी तिने दिली होती. याच भीतीतून गोरखनाथने तिला संपवण्याचा कट रचला.
५ मे रोजी रात्री गोरखनाथने आफरीनला भेटीसाठी बोलावले. खराडी बायपासवरील रिलायन्स मॉलजवळ ती त्याच्या कॅबमध्ये बसली. गाडीत पुन्हा पैशांवरून वादावादी झाली. गोरखनाथने गाडी आव्हाळवाडीच्या दिशेने नेली आणि एका निर्जन ठिकाणी गाडी थांबवून आफरीनचा गळा दाबून खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह गाडीतच ठेवून त्याने तो केशवनगर कचरा डेपो जवळील अंधारात फेकून दिला आणि तो पसार झाला.
सीसीटीव्ही फुटेजमुळे गुन्ह्याचा उलगडा
घटनास्थळी सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने सुरुवातीला पोलिसांसमोर ओळख पटवण्याचे मोठे आव्हान होते. मात्र, मुंढवा पोलीस आणि गुन्हे शाखेने परिसरातील सर्व जोडणाऱ्या रस्त्यांवरील फुटेज तपासले. त्यात एक संशयास्पद कॅब दिसून आली. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी गोरखनाथला ताब्यात घेतले. सखोल चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close