डोळे येण्याच्या संसर्गजन्यात होत आहे वाढ.वेळीच काळजी घेण्याची गरज
घाटंजी तालुका प्रतिनिधी -सचिन कर्णेवार
सध्या वातावरण बदलामुळे डोळे येण्याच्या संसर्गजन्यात वाढ होत असून जास्तीत ज्यास्त डोळे आलेली पेशन्ट दिसत असून त्याचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. लहान मुलात शाळा व ईतर सार्वजनिक ठिकाणी फिरत असलेल्या डोळे येणा-या व्यग्तीनी काळजी घेऊन हा संसर्ग इतरांना होणार नाही याची काळजी घेण्यात यावी. हा डोळ्यांचा विषाणू संसर्ग हा मुख्यत्वे ॲडीनो वायरसमुळे होतो.याच्या लक्षणांमध्ये डोळ्यांना खाज सुटणे, डोळे लाल होणे, पापण्या सुजणे आणि संसर्ग झालेल्या डोळ्यांतून पांढरा स्त्राव येणे, यांचा समावेश होतो. डोळ्यांचा विषाणूजन्य संसर्ग हा सौम्य प्रकारचा संसर्ग असला तरी देखील याबाबत नागरिकांनी आवश्यक काळजी घेणे गरजेचे आहे. जसेकी,डोळे येणा-या व्यग्तीनी वारंवार डोळ्याला हात लाऊन इतरत्र न पुसने,एकच टावेल,रुमाल, कापड डोळे पुसून अस्वच्छ न ठेवणे. सार्वजनिक ठिकाणी चष्मा लावणे ह्या सारखी काळजी ह्यावी. जेणेकरून ही साथ इतरांना लागणार नाही.
डोळ्याची साथ पसरू नये म्हणून सार्वजनिक आरोग्य विभागाने जनजागृती करण्याचीही गरज आहे. मुख्यत्वेकरून लहान मुलांची काळजी घेन्यात येऊन डोळे येणा-या मूलांना प्रादूर्भाव कमी होईपर्यंत शकतो शाळेत पाठवू नये जेणे करून ईतर मूलांना त्याचा संसर्ग होणार नाही.