डुक्कर आडवा आल्याने ट्वेरा पलटी , महिला दगावली
मोर्शी / प्रतिनिधी
मोर्शी ते वरुड रस्त्यावरील भाईपुर फाट्याजवळ डुकर आडवा आल्याने भरधाव तवेरा पलटी झाल्याची घटना घडली यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला असून 14 इसम जखमी झाले आहे त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सोमवार दिनांक 27 जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाच ते सहा वाजताच्या दरम्यान मोर्शी गावापासून अवघ्या 4 किमी अंतरावर असलेल्या भाईपुर फाट्या जवळ वराह आडवा आल्याने तवेरा गाडी क्रमांक एमएच 12 एफ झेड 1196 ही पलटी झाली.
झालेल्या अपघातात साजिया बानो अक्रम अली वय 40 वर्ष, राहणार खरपी तालुका परतवाडा ही घटनास्थळी ठार झाली तर आलिशा फतेमा वय 9 वर्ष,आयेष फातिमा वय 10 वर्ष,जेहान अली वय 12 वर्ष, मोसीम खान वय 34 वर्ष, इलायत अली वय 40 वर्ष, शीजा फातिमा वय 14 वर्ष, अत्तहर खान वय 13वर्ष, शहिदा बानो वय 50 वर्ष, जहेर अली वय 5 वर्ष, फराह असलम अली वय 30 वर्ष, अलीजा फतेह वय 7 वर्ष, आरजू फत्तेमा वय 4 वर्ष, बीबी नाज वय 30 वर्ष गंभीर जखमी झाल्या होत्या. तेथे उपस्थित नागरिकांच्या मदतीने जखमींना मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपजिल्हा रुग्णालय येथे जखमींवर औषध उपचार केल्यानंतर सर्व जखमींना अमरावती येथील जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे. जखमी नागरीक हे परतवाडा नजीक असलेल्या खरपी येथून तवेरा गाडी क्रमांक एम एच 12 एफ झेड 1196 ने वरुड येथे जात असल्याचे समजते. वरुड येथे जात असतानाच वराह आडवा आल्याने हा अपघात घडल्याचे समजते.
अधिक तपास मोर्शी पोलीस करीत आहे.