सामाजिक

डोकाडिया कुटुंबाची आत्महत्या ? शरीरात सापडलं उंदीर मारण्याचं औषध 

Spread the love
पायधूनी / विशेष प्रतिनिधी
        येथील डोकाडिया कुटुंबातील चार सदस्यांच्या मृत्यूप्रकरणात अजब खुलासा होत आहे. त्यांच्या शरीरात उंदीर मारण्याचे औषध सापडल्याने त्यांनी आत्महत्या केल्याची शंका वर्तविण्यात येत आहे. आधी त्यांनी उंदीर मारण्याचे औषध खाल्ले असावे आणि त्याची चव घालवण्यासाठी टरबुज खाल्ले असावे असा अंदाज आहे. दातात अडकलेल्या टरबुजाच्या सालीवर त्याचे अंश आढळले आहेत. 
26 एप्रिलला अवघ्या काही तासांच्या अंतरात डोकाडिया कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. अब्दुल्ला डोकाडिया (44), त्यांची पत्नी नसरीन (35) आयेशा (16)  आणि झैनब (13) यांचा अचानक मृत्यू झाला होता. चौघांनी रात्री बिर्याणी खाल्लायनंतर कलिंगड खाल्लं होतं. त्यामुळे कलिंगड खाल्याने मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात होती. 
 

डोकाडिया परिवाराच्या पोटात उंदीर मारण्याचं औषध गेल्यानंतर त्यांना तात्काळ उलट्या झाल्या. यामुळे काही प्रमाणात विष शरीराच्या बाहेर पडलं. त्यामुळे त्यांचा मृत्यू त्याचवेळी न होता दुसऱ्या दिवशी झाला अशी सूत्रांची माहिती आहे.

उंदीर मारण्याच्या औषधाने चौघांचा मृत्यू झाल्याचं याआधी उघड झालं आहे. चौघांच्याही शरीरात उंदीर मारण्याच्या औषधाचे (Zinc Phosphide) अंश सापडले आहेत. चौघांच्या शरीरात तसंच कलिंगडाच्या नमुन्यांमध्ये देखील सापडलं Zinc Phosphide सापडलं आहे.

डोकाडिया कुटुंबाने  25 एप्रिल रोजी रात्री 10.30 च्या सुमारास, जवळच्या नातेवाईकांसह कुटुंबातील नऊ सदस्यांनी एकत्र रात्रीचं जेवण केलं होतं. नातेवाईक निघून गेल्यानंतर, रात्री 1 ते 1.30 च्या दरम्यान कुटुंबातील मृत पावलेल्या चार सदस्यांनी कलिंगड खाल्लं होतं. 26 एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास, म्हणजेच 5.30 ते 6 च्या दरम्यान, या चौघांनाही जुलाब आणि उलट्यांसारखी तीव्र लक्षणे जाणवू लागली. सुरुवातीला त्यांच्यावर कुटुंबाच्या डॉक्टरांनी उपचार केले आणि त्यानंतर पुढील उपचारांसाठी त्यांना जे.जे. रुग्णालयात पाठवण्यात आले.

वैद्यकीय उपचार सुरू असूनही, त्यांची धाकटी मुलगी झैनब हिचा सकाळी 10.15 च्या सुमारास मृत्यू झाला; तर अब्दुल्ला यांचा त्याच रात्री 10.30 च्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. नसरिन आणि त्यांची मोठी मुलगी आयेशा यांचाही उपचारादरम्यानच मृत्यू झाला.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close