क्राइम

भोंदू बाबा खरात चा सहयोगी पोलिसांच्या जाळ्यात  माजी आयुक्त ला कोल्हापूर येथील लॉज वरून केली अटक 

Spread the love
कोल्हापूर / विशेष प्रतिनिधीं
                राज्यात अनेक महिलांना आपल्या वासनेचा बळी बनविणाऱ्या अशोक खरात चा सहयोगी कोल्हापूर पोलिसांकडून राबविण्यात येत असलेल्या  सखोल तपासणी मोहीमेत पोलिसाना मोठे यश आले आहे. या मोहिमेला ऑपरेशन ऑलआऊट असे नाव देण्यात आले होते. या मोहिमेचा एक भाग म्हणून विविध पथके कसून तपासणी करत होती. याच तपासादरम्यान पोलिसांना एका गुन्ह्यातील फरार संशयित आरोपी एका छोट्या गावातील लॉजमध्ये लपून बसल्याची माहिती मिळाली. माहितीच्या आधारे कारवाई करत पोलिसांनी रात्री उशिरा एका हॉटेलवर अचानक छापा टाकला. या कारवाईमुळे रात्री उशिरा त्या परिसरात मोठी खळबळ उडाली.
प्राप्त माहितीनुसार , नाशिक शहरात भोंदू बाबा म्हणून कुप्रसिद्ध असलेला कॅप्टन अशोक खरात याचा मुख्य साथीदार या छाप्यात पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. अटक करण्यात आलेल्या संशयित व्यक्तीचे नाव महेश भाऊराव आहेर असे आहे. तो एका अत्यंत गंभीर अशा महिलेवरील अत्याचाराच्या प्रकरणात संशयित आरोपी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , महेश भाऊराव आहेर हा मूळचा कासारवडवली, जि. ठाणे येथील रहिवासी आहे. धक्कादायक बाब म्हणजे , हा संशयित यापूर्वी माजी सहायक आयुक्त यांसारख्या महत्त्वाच्या पदावर कार्यरत होता.
स्वतःवर गंभीर गुन्हे दाखल झाल्यानंतर पोलिसांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी हा आरोपी पळून गेला होता. मिळालेल्या तपशिलानुसार तो २० एप्रिल २०२६ पासून पोलिसांना गुंगारा देत पसार झाला होता. त्याचा शोध घेण्यासाठी विविध पथके मागावर होती. अखेर हा आरोपी कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील नरंदे या एका छोट्याशा गावात आश्रयाला आला होता. तेथील एका हॉटेलमध्ये तो लपून राहत असताना , स्थानिक गुन्हे शाखा पथकाने ऑपरेशन ऑलआऊट अंतर्गत योग्य खबरदारी घेत हॉटेलला वेढा घातला आणि त्याला शिताफीने अटक केली.
गेल्या काही दिवसांपासून फरार असलेल्या या माजी सहायक आयुक्त पदावरील व्यक्तीला पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखा पथकाला मोठे यश प्राप्त झाले आहे. या ठिकाणी अटकेची प्राथमिक कारवाई पूर्ण झाल्यानंतर , येथील पोलिसांनी पुढील विस्तृत तपासासाठी आणि कायदेशीर प्रक्रियेसाठी त्याला रात्री उशिरा ठाणे पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close