हटके

विद्युत विभागात नोकरीवर असलेल्या पतीचे क्रॉस कनेक्शन पत्नीचा पतीला विजेचा धक्का

Spread the love

लखनऊ / नवप्रहार मीडिया 

                 पती नोकरीवर आणि तो ही विद्युत विभागात असला तर त्याला रात्रिअरात्री घराबाहेर ड्युटी वर जाव लागतं हे खरे असले तरी काही नोकरदार पती ड्युटी चे कारण सांगून भलतेच प्रकार करत असतात. शामली येथील विद्युत विभागात काम करणारा व्यक्ती ड्युटी चे कारण सांगून कधीही घराबाहेर राहत होता. त्याच्या वागण्यावर पत्नीला संशय होता त्यामुळे ती त्याला रंगेहाथ पकडण्याच्या तयारीत होती. आणि ती संधी तिला चालून आली. तिने त्याला रंगेहाथ पकडुन चांगलीच अद्दल घडवली . 

उत्तर प्रदेशच्या शामली जिल्ह्यातील ही घटना इथल्या वीज विभागातील एसडीओ आधी सहारनपूरमध्येच तैनात होता. गुरुवारी रात्री त्याने आपल्या पत्नीला ऑफिसच्या कामासाठी बाहेरगावी जायचं असल्याचं सांगितलं. पण पत्नीला संशय होता. त्यामुळे तिने शामली येथील एका अधिकाऱ्याला फोन केला आणि आपल्या पतीला कुठे पाठवलं आहे, अशी विचारणा केली. अधिकाऱ्याने त्याला कुठेही पाठवलं नसल्याचं सांगितलं.

तेव्हा पत्नीचा संशय अधिक बळावला. तिने जसा तिचा पती घऱाबाहेर पडला आणि कारमधून जाऊ लागला. तेव्हा तिनंही त्याच्या गाडीचा पाठलाग केला. तो सहारनपूरमधील दिल्ली रोडवर एका घरात गेला. ती लगेच त्याच्या मागोमाग त्या घरात गेली नाही. काही वेळाने ती त्या घरात गेली. तेव्हा तिनं जे पाहिलं ते पाहून तिला झटकाच बसला.

तिचा नवरा एका खोलीत एका महिलेसोबत नको त्या अवस्थेत होता. तिनं तिथं गोंधळच घातला. ती आपल्या पत्नीची मैत्रीण होती, एनर्जी कॉर्पोरेशनच्या ऑफिसममध्ये शिपाई म्हणून तैनात होती, असा दावा तिनं केला. महिलेने लगेच पोलिसांना फोन केला. पोलिसांनी एसडीओला पोलीस ठाण्यात आणलं. पण नंतर पत्नीने कोणतीही कारवाई करण्यास नकार दिला.

 सदर बाजार पोलीस ठाण्याचे प्रभारी रमेशचंद्र यांनी सांगितलं की, एसडीओला गुरुवारी रात्रीच पोलिस ठाण्यात आणण्यात आलं. याप्रकरणी पत्नीने एसडीओविरोधात कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही. त्यानंतर शांतता भंग केल्याप्रकरणी एसडीओला चालना देण्यात आली. त्याला जामीनही मिळाला आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close