आ. श्री शामभाऊ खोडे यांनी 100 दिवसीय क्षयरोग मोहिमेत सहभागी होण्याचे नागरिकांना केले आवाहन
“आमदार.खोडे यांच्या हस्ते निक्षय मिञ पोस्टरचे अनावरण , निक्षय मित्र होण्याच्या केले आवाहन
वाशिम ; आज दि .21 जानेवारी 2025 रोजी मंगरूळपीर तालुका येथे पंचायत समितीच्या सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा क्षयरोग विभाग वाशिम व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय मंगरूळपीर यांच्या वतीने (TB ) टी.बी १०० दिवस विशेष मोहीम कार्यक्रम, BCG लसीकरण,साई टी.बी मोहिमे अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला वाशिम मंगरूळपीर विधानसभेचे आमदार श्री.श्याम खोडे यांची उपस्थिती होते. त्यांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्री.पांडुरंग ठोंबरे,जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.श्री.परभनकर, मंगरूळपीर तालुका आरोग्य अधिकारी डॉ.धनश्री जाधव,डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ रंजीत फुके,सचिव डॉ. दिलीप रत्नपारखी यांची उपस्थिती.
यावेळी आमदार श्री शाम खोडे यांनी क्षयरोग विभागाचा सविस्तर आढावा घेऊन जिल्ह्यातील क्षय रुग्णांचा आकडा जाणून घेतला.टी.बी आजारामध्ये वाशिम जिल्हा उत्कृष्ट कामगिरी करीत असून टी.बी मुक्ताच्या लढ्यामध्ये सखोल योगदान देत आहे. 100 दिवस विशेष मोहिम, अडल BCG लसीकरण,सी वाय टी.बी मोहिम व क्षयरोग विभागाच्या कार्याची दखल घेऊन यावेळी आमदार श्याम खोडे यांनी सर्वांचे कौतुक केले. यावेळी आमदार खोडे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते निश्चय मित्र पोस्टर फलकाचे अनावरण केले. जास्तीत जास्त संख्येने निक्षय मित्र तयार होण्याचे आव्हान करीत पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत टी.बी मुक्त लढ्यामध्ये आपण सर्वांनी योगदान देण्याचे आवाहन यावेळी केले होते.
या कार्यक्रमाला उपस्थित आमदार श्री श्याम खोडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.पि.एस ठोंबरे,जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.सतिश परभनकर,मंगरूळपीर तालुका आरोग्य अधिकारी डॉ.धनश्री जाधव, जिल्हा कार्यक्रम समन्वयक समाधान लूनसूने,जिल्हा पी.पी.एम समन्वयक जयकुमार सोनुने,अशोक भगत,गणेश रगुवंशी,संतोष बल्लाळ,आरोग्य सहाय्यक विनोद श्रीराव,सांख्यिकी सहाय्यक प्रमोद उगले,लेखापाल जितेश वर, पि.पि.एस.एय जिल्हा कोऑर्डिनेटर डिगांबर,क्षेत्रकार्य अधिकारी प्रदिप पट्टेबहादूर,रिना शिंदे,सोनिया भगत,शिपाई भिमटे, यांची उपस्थिती होती.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप पट्टेबहादुर यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.धनश्री जाधव मॅडम केले. उपस्थित सर्वांचे आभार संतोष बल्लाळ यांनी मानले