क्राइम
अर्चना मृत्यू प्रकरणात आरोपींच्या पोलीस कोठडीत 4 जून पर्यंत वाढ
अर्चनाचा मृतदेह पोलिसांना गवसणार की नाही ?*
अटकेतील आरोपी पोलिसांची दिशाभूल करत असल्याची परिसरात चर्चा….
आरोपींना 4 जून पर्यंत न्यायालयीन कोठडी: तपास सुरु…
राजू आगलावे/भंडारा
भंडारा जिल्ह्यातील गोबरवाही पो.स्टे. च्या हद्दीतील कवलेवाडा येथील 23 वर्षीय तरुणी अर्चना राऊत मृत्यू प्रकरणात न्याय्यलयाने वाढ केली आहे. आरोपींना 4 जून पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पण यानंतरही पोलिसांना अर्चनाचा मृतदेह गवसणार किंवा नाही अशी चर्चा जन सामन्यांत रंगत आहे.

अर्चना ही कामाच्या ठिकाणावरून चार वर्षांपूर्वी बेपत्ता झाली होती.या प्रकरणात पोलीस हातपाय मारत असतानाच एका प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने अर्चनाचा मृतदेह मृतदेह चिखला माॅईन परिसरातील एका खड्डयात पुरण्यात आल्याचे सांगितले. त्यानंतर गोबरवाही पोलिसांनी या प्रकरणात संजय चित्तरंजन बोरकर वय (47), राजकुमार उर्फ राजू चितरंजन बोरकर वय (50) दोघेही रा. नेहरू वॉर्ड, कवलेवाडा व धरम फागू सयाम वय (42) रा. मोहगाव टोला यांना अटक करून न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने आरोपींना 31 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने आज दि. 1 जून रोजी पुन्हा आरोपींना न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीत वाढ करण्याची विनंती पोलीस विभागा कडून करण्यात आली होती. त्यावर न्यायालयाने आरोपींच्या पोलीस कोठडीत 4 जून पर्यंत वाढ केली आहे.
अर्चनाचा मृतदेह पोलिसांना गावसणार की नाही- गोबरवाही पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपींनी सांगितलेल्या ठिकाणी व जवळपासच्या परिसरात खड्डे खोदून मृतदेहाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना यश आले नाही. त्यामुळे आरोपी पोलिसांची दिशाभूल करीत असल्याची चर्चा दबक्या आवाजात जनतेत सुरू आहे. सोबतच अर्चनाचा मृतदेह पोलिसांना गवासणार किंवा नाही ? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1
1