बाल आनंद मेळाव्यातून विद्यार्थ्यांना कमवा व शिकातून व्यवहारीक ज्ञानाचे धडे:
: रहेमानिया उर्दू शाळेत आनंद मेळावा यशस्वी
वाशिम / प्रतिनिधी
रहेमानिया उर्दू शाळा रिसोड येथे दि.२३/०१/२०२५ (गुरुवार) रोजी बाल आनंद मेळावा घेण्यात आला. या कार्क्रमाचा उद्घाटन (PSI) अब्दुल कदीर यांचे हस्ते करण्यात आला होता. व अब्दुल कदीर सर यांची रिसोड पोलीस स्टेशन येथे (psi) पदावर नियुक्ती झाल्याने त्यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. आनंद मेळाव्यात एकूण २१ स्टॉल होते त्यात आपले पारंपारिक खाद्यपदार्थ आणले होते. या मेळाव्यात मुलांना व्यवहार ज्ञान, नफा- तोटा, फायदा- नुकसान व हिशोब ताळमेळ हे सर्व कौशल्य विद्यार्थ्यांना या मेळाव्यातून शिकण्यास मिळाले.व्यावहारिक ज्ञान महत्त्वाचे शालेय जीवनात शिक्षणासोबत विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान देखील येणे गरजेचे आहे.आनंद नगरी मेळाव्यात विद्यार्थ्यांनी विविध स्टॉल लावून स्वतः बनवलेल्या पदार्थांची विक्री केली. त्यातून दोन पैसे मिळवले हे खरच कौतुकास्पद आहे. शाळेने राबविलेला हा उपक्रम त्यांना भविष्यात नेहमीच चालना देईल, अशी प्रतिक्रीया मुख्याध्यापक बिलाल अहमद खान सर यांनी दिली. या कार्यक्रमांमध्ये शाळेचे अध्यक्ष हाजी रफि अहमद सर, मुख्याध्यापक बिलाल अहमद खान सर, मुख्याध्यापक, तौफिक अहमद सर, रिसोड पोलीस स्टेशन चे (psi) सैय्यद हारून सर, (psi) अब्दुल कदीर सर, व शाळेचे शिक्षक उपस्थित होते.