आरोग्य व सौंदर्यशाशकीय

तुकाराम मुंढे यांचा पतंजलि ला दे धक्का

Spread the love

मुंबई / विशेष प्रतिनिधी

अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या आयुक्त पदाचा कारभार स्वीकारल्या नंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पूर्वीच्या इतर विभागाप्रमाणे कारवाईचा सपाटा लावला आहे. केवळ तीनच दिवसांत मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, कोकण, छत्रपती संभाजीनगर विभागात धडक करवाई करुन ५३ ठिकाणी धाडी टाकल्या, तसंच भेसळ करणाऱ्या ३३ जणांवर अटके ची कारवाई केली आहे. बाबा राव यांच्या पतंजली स्टोअर्स वर देखील मुंढे यांच्या कारवाईचा बुलडोजर चालला आहे. त्यामुळे भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

अन्न व औषध प्रशासनं अर्थात एफडीएनं या कारवाईची माहिती एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. त्यानुसार, पतंजलीच्या या दिव्य फार्मसीच्या औषधांची जाहिरात ही अत्यंत आक्रमकपणे आणि शंभर टक्के उपचारांची हमी देणाऱ्या असा उल्लेख केलेल्या आहेत. यातील बऱ्याच जाहिरातींमधून दिशाभूल आणि ग्राहकांची फसवणूक होत असल्याचंच प्रतित होतं. कारण या जाहिरातींमध्ये चमत्कारीक उपचार वैगरेंसारखे शब्द वापरलेले आढळतात. या आयुर्वेदिक औषधांची जाहिरात करताना अत्यंत गंभीर स्वरुपाचे आजार जसे की कॅन्सर, डायबेटिस यांच्यावर हमखास उपचार असा दावा करण्यात आला आहे. त्याचबरोबर कुठल्याही प्रकारचे वैज्ञानिक आधार नसलेले चमत्कारीकरित्या बरं करणारे दावे देखील या जाहिरातींमधून करण्यात आले आहेत.

दरम्यान, अन्न व औषध विभागाच्या आयुक्तपदाचा कारभार स्विकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट इशारा दिला होता की, जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या आणि त्यांची फसवणूक करणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला किंवा संस्थेला कारवाईला सामोरं जावं लागणार आहे. यानंतर आता पतंजलीच्या औषधांवर कारवाईनंतर एफडीएनं देखील हे स्पष्ट केलं आहे की, औषधं व सौंदर्य प्रसाधन कायदा १९४० चं उल्लंघन करणाऱ्यांना यापुढे थेट कोर्टासमोर हजर करुन योग्य ती कारवाई केली जाणार आहे.

तुकाराम मुंढेनी पदभार स्विकारल्यानंतर केवळ तीनच दिवसांत मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, कोकण, छत्रपती संभाजीनगर विभागात धडक करवाई करुन ५३ ठिकाणी धाडी टाकल्या, तसंच भेसळ करणाऱ्या ३३ जणांवर अटकची कारवाई केली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close