क्राइम

जमिनीचा वाद ,.एकाच कुटुंबातील सहा जण जीवनातून बाद

Spread the love

विजापूर / विशेष प्रतिनिधी 

              भाऊ बंदकित जमिनीचा इंच घराचा वाद आणि त्यातून होणारी भांडणे अनेक वेळा टोकाचे पाऊल उचलत होणारे खून ही काही नवीन बाब नाही. जमिनीचा वादातून सहा लोकांची हत्या झाल्याची धक्कादायक आणि खळबळजनक बाब उघड झाली आहे. 

 घटना कर्नाटकमधील विजापूर इथं घडली आहे.विशेष म्हणजे, महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर निराळे सावकार म्हणून खिल्लारी बैलाचे संगोपन करणारे प्रसिद्ध निराळे यांच्या कुटुंबासोबत हे कृत्य घडलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकमधली विजापूर जिल्ह्यातील चडचण तालुक्यातील गोविंदपूर गावात ही घटना घडली आहे. गावातील निराळे आणि गोळगी कुटुंबामध्ये २५ एकर शेतीवरून बऱ्याच दिवसांपासून वाद होता. ही २५ एकर जागा निराळे कुटुंबीयांनी खरेदी केली होती. पण, या शेतीला गोळगी कुटुंबातील एका नातेवाईकांचा विरोध होता. यातून बऱ्याच वेळा वाद झाला होता. पण, तरीही निराळे कुटुंबाने ही जमीन खरेदी केली.

शेतात गेले अन् घात झाला

निराळे कुटुंबीयातील मयत रेवणसिद्धप्पा निराळे, दुंडप्पा रेवणसिद्धप्पा निराळे, शिवपुत्र रेवणसिद्धप्पा निराळे, चंद्रशेखर निराळे आणि शब्बीर अत्तार हे सगळे शेतात साफसफाईसाठी गेले होते. तेव्हा तिथे गोळगी कुटुंबातील लोक तिथे पोहोचली. त्यामुळे दोन्ही गटामध्ये वाद उफाळून आला. हा वाद नंतर हिंसाचारात रुपांतरीत झाला. गोळगी कुटुंबातील सदस्यांनी निराळे कुटुंबीयांवर गोळीबार केला. त्यानंतर धारदार शस्त्राने हल्ला करून ६ जणांची हत्या केली.

शेताच्या रस्त्यावर मृतांचा खच

मृतांमध्ये चडचण नगरपंचायतीचे सदस्य चेतन निराळे आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा समावेश आहे. रेवणसिद्धप्पा निराळे, दुंडप्पा रेवणसिद्धप्पा निराळे, शिवपुत्र रेवणसिद्धप्पा निराळे, चंद्रशेखर निराळे, शब्बीर नदाफ अत्तार आणि आणखी एका व्यक्तीचा मृतांमध्ये समावेश आहे. धक्कादायक म्हणजे, शेताच्या रस्त्यावर अवघ्या काही फुटांवर ६ जणांचे मृतदेह पडून होते. मृतांच्या डोक्यावर आणि मानेवर धारदार शस्त्रांने वार करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अप्पुगौडा आणि त्याच्या साथीदारांनी हा हल्ला केल्याचा संशय पोलिसांना वर्तवला आहे आहे. अप्पुगौडा हा भीमा खोऱ्यातील जुन्या खुनाच्या प्रकरणातील मृत मानकप्पा मास्टरचा नातेवाईक असल्याचं सांगितलं जात आहे. या हत्याकांडामध्ये शेतात कामासाठी आलेले मजूर शब्बीर नदाफ यांचाही या हल्ल्यात मृत्यू झाला आहे.

विजापूरचे पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचं पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झालं. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास चडचण पोलीस करत आहे.

चडचणचे निराळे सावकार

विशेष म्हणजे, शेतकऱ्यांमध्ये खिल्लार बैलाला मोठी मागणी असते. खिल्लार बैल हा आपल्याकडे असं प्रत्येक शेतकऱ्याला वाटत असतं. कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सिमेवर खिल्लार जातीच्या बैलाचं संगोपन हे निराळे यांच्या कुटुंबीयांकडून केलं जातं. निराळे यांच्या कुटुंबीयांनी चडचणची यात्रा सुरू केली होती. इथं कर्नाटक आणि महाराष्ट्र भरातून शेतकरी इथं खिल्लार बैल घेण्यासाठी येत होते. निराळे यांची चौथी पिढी काम करतेय.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close