शाळा म्हणजे भविष्य घडविणारी पुण्य आणि पवित्र जागा. पण विद्यार्थ्यांना घडविण्याची जबाबदारी ज्या शिक्षक वर्गावर असते त्याच शिक्षकांत मागील काही काळापासून शाळेतच भांडणे होत असल्याचा गंभीर प्रकार घडत आहे. एका शाळेत अश्याच दोन शिक्षिकेत तुफान हाणामारी झाली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यावर त्यावर युजर्स मी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
नायिका या जिल्हा परिषद शाळेत महिला मुख्याध्यापक आणि महिला ग्रंथपाल यांच्यात अचानक तुफानी भांडण झाले.
व्हिडिओत तुम्हाला शाळेचा परिसर दिसत असून सुरुवातीस दोन शिक्षिका काही कारणास्तव भांडण करत होत्या. सर्वांना वाटले हा वाद मिटेल, पण पाहता पाहता दोघींही एकमेंकीना मारण्यास सुरुवात करतात. हाणामारी इतक्या टोकाला जाऊन करतात की, दुसऱ्या शिक्षिका आल्यावर दोघीही थांबल्या. या घटनेनंतर शाळेच्या व्यवस्थापन समितीने तातडीने बैठक घेतली. प्राथमिक चौकशीनंतर दोघींना पदावरून दूर करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
पालकांसह विद्यार्थी वर्गातून तुफान प्रतिक्रिया
नेटिझन्सकडून या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. एका यूजरने कमेंट केली,”आता शाळेत जाण बोर नाही तर भारी आहे” तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,”आमच्या वेळी असं का होत नव्हतं” तर काही पालकांनी म्हटलं की,”कडक कारवाई करण्यात यावी” अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.
टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.