ती आली …! काही कळायच्या आत तिने नवरदेवाला लाथ मारून पाडते आणि धु धु धुते

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असे माध्यम झाले आहे की याठिकाणी कधी काय व्हायरल होईल याचा नेम नाही. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी तुमच्या हातून झालेली छोटीशी चूक देखील जगा पर्यंत पोहोचू शकते. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात एक तरुणी लग्नाचे विधी सुरू असताना मंडपात प्रवेश करते. आल्या आल्याचं ती नवरदेवालाआ लाथ मारून पाडते. आणि त्यावर न थांबता ती त्याला धु धु धुते.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला लग्नसराईची जोरदार तयारी दिसत असून अनेक पाहुणे मंडळी मंडपात आहेत.दरम्यान नवरी नवरदेवाच्या गळ्यात हार घालते,त्यानंतर नवरेदवही नवरीच्या गळ्यात हार घालणार असतो,मात्र त्याच दरम्यान एक तरुणी रागाच्या भरात तिथे येते आणि नवरदेवाला जोरदार लाथ मारते त्यामुळे नवरदेव चक्क जमिनीवर आपटला जातो.तरीही ती तरुणी त्या नवरदेवाला मारण्याचे थांबत नाही,त्यातच तिथे एक महिला येते आणि तरुणीला थांबवते.सर्व घटना लग्नातील एका व्यक्तीने मोबाईमध्ये कैद केलेली आहे.
लग्नकार्यातील धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सध्या इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून इन्स्टाच्या ‘hasa_hasat_raha’या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे.व्हिडिओ नक्की कुठल्या शहरातील आहे हे समजू शकलेले नाही,मात्र सध्या चांगलाच व्हायरल झालेला आहे.व्हिडिओला आतापर्यंत लाखोंच्या संख्येत व्ह्यूज मिळालेले आहेत.
तरुणीची मंडपात जबरदस्त एन्ट्री पाहून नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया व्हिडिओवर दिलेल्या आहेत.त्यातील एका यूजरने कमेंट केली आहे,”लग्नाच्या आधी प्लास्टिक सर्जरी करायची ना भाऊ”तर दुसऱ्या एका यूजरने कमेंट केली,”हे असच असत खर्याची…दुनिया..नाही.खर प्रेम करणाऱ्या ला कोणी भेटत नाही” तर अजून एकाने कमेंट केली,”आमच्या गावातील घटना आहे ही नवरदेव ची पहिली प्रेयसी होती”,अशा अनेक कमेंट आलेल्या आहेत.
टीप: लग्नातील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.