अखिल भारतीय बारी समाज राष्ट्रीय अधिवेशन अंतिम नियोजन बैठक आज शेगाव नगरीत
अंजनगाव सुर्जी ,मनोहर मुरकुटे
अखिल भारतीय बारी समाज राष्ट्रीय अधिवेशनाची तयारी ही अंतिम टप्प्यात आली असून, गेली एक वर्षापासून सुरू असलेल्या ह्या चळवळीला आता मूर्त रूप आले आहे
,सदरचे अधिवेशनामध्ये समस्त बारी समाजाच्या
गेली कित्येक वर्षापासून प्रलंबित असलेल्या मागण्या ह्या पूर्ण व्हाव्या व बारी समाजाला एक राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रात स्थान मिळावे ह्या उद्देशाने अखिल भारतीय बारी महासंघाचे अध्यक्ष रमेश जी घोलप व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे अथक प्रयत्नाने गेली एक वर्षापासून अधिवेशनाचे नियोजन सुरू होते त्या नियोजनाचा अंतिम टप्पा हा अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपला आहे अधिवेशनाची परिपूर्ण अशी तयारी झाली असून या अधिवेशनामध्ये काही बारी समाजाच्या प्रलंबित असलेल्या मागण्या ह्या उपस्थित मान्यवरांच्या समोर ठेवून त्यावर त्वरित अंमलबजावणी करून हे सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी मान्यवरांना विनंती करण्यात येणार आहे त्यासाठी १ ऑक्टोबरला होणाऱ्या अधिवेशना साठी काही
महत्वाची कामे व अंतिम नियोजन मीटिंग,शेगांव येथे आज आयोजित केली आहे, ह्या अंतिम नियोजनासाठी दिनांक २४.०९.२०२३ रोज रविवार ला ठीक ११.०० ते सायंकाळी ०५.०० वा. पावेतो ** गणेशप्रस्थ मंगल कार्यालय, **. खामगाव रोड,विद्युत वितरण कार्यालयाजवळ ,शेगांव येथे , बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या कार्यक्रमाला संस्थेचे व महासंघाचे पदाधिकारी यांची उपस्थिती अनिवार्य आहेच याशिवाय बारी समाजाची सेवाभावी तरुण मंडळी,शेगांव मधील पदाधिकारी व सामाजिक सहभाग नोंदविणारी सर्व मंडळी सुद्धा आमंत्रित आहेत
तसेच या बैठकीसाठी आपण केलेल्या विनंती वरून मा. आमदार श्री संजयजी कुटे व मा.आमदार श्री प्रवीणजी दटके हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत
सदरचे बैठकीमध्ये
१.आतापावेतो झालेली तयारी
२. प्राप्त वर्गणी
३. अपेक्षित खर्च
४. पाहुण्यांचे भोजन/ नाश्ता/चहा पाणी/ व इतर सुविधांचे नियोजन
५. भुसावळ व शेगांव रेल्वे स्टेशन वरील नियोजन
६. VIP आगमन/ नियोजन
७. दि ३० चे महा जातपंचायत व त्यामधील विषय
८. स्टेज नियोजन
९. हार/ बुके / स्वागत / संचलन
१०. वेगवेगळ्या नियोजन समितीचे गठण
११. मोमेंटो/ प्रशस्तीपत्रे / सत्कार
१२. मंडपातील व्यवस्था
व ऐनवेळी सदस्यांनी सुचविलेले विषय,येऊ शकणाऱ्या अडचणी,त्यावरील उपाययोजना या विषयांवर सविस्तर अशी अंतिम चर्चा होणार असून ह्या बैठकीला सर्व समाज बांधवांनी जास्त जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अखिल भारतीय बारी महासंघाचे अध्यक्ष रमेश जी घोलप केंद्रीय उपाध्यक्ष रमेशजी डब्बे, रतनजी फुसे, प्रसिद्धी प्रमुख मनोहर मुरकुटे व सर्व समाज बांधव, पदाधिकारी यांनी केले आहे