क्राइम

उसनवारी घेतलेले पैशे फेडणे न झाल्याने तीन नराधमां कडून लैंगिक अत्याचार 

Spread the love

गोंदिया / नवप्रहार मीडिया नेटवर्क 

               काही वेळा गरिबांवर आई अत्याचार होतात की गरिबी हा अभिशाप तर नाही असे वाटायला लागते. पूर्वी जमीनदारांकडून गरीब मजुरांसोबत असे कृत्य केले जायचे. पण 21 व्या शतकात देखील पैश्याची परतफेड शारीरिक उपभोगातून आणि तेही कायदे पूर्वीपेक्षा आणखी कडक झाल्यावर . यावरून गुन्हेगारांत कायद्याचा वचक राहिला नसल्याचे दिसून येते.एकिकडे केंद्र शासन गुन्ह्याचा निकाल लवकर लागावा म्हणून कायद्यात बदल करत आहे. तर दुसरीकडे गुन्हेगार कायदा त्यांचे काहीच वाकडे करू शकत नाही. अश्या अविर्भावात वावरत आहेत. गोंदिया जिल्ह्यातून अशीच मन हेलावणारी घटना समोर आली आहे.

 एका महिलेनं आपल्या आजारी मुलाच्या उपचारासाठी उसनवारीने पैसे घेतले होते. मात्र, ती या पैशांची परतफेड करू शकली नाही. यानंतर तीन नराधमांनी या 42 वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार केला. ही घटना गोंदिया तालुक्यातील सतोना येथून समोर आली आहे.या प्रकरणात रावणवाडी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. या घटनेत 42 वर्षीय महिलेनं सप्टेंबर 2021 मध्ये आपल्या आजारी मुलाच्या उपचारासाठी उसनवारीने पैसे घेतले होते. मात्र, ती वेळेत या पैशांची परतफेड करू शकली नाही.

यानंतर तीन आरोपींनी सप्टेंबर 2021 ते मार्च 2023 या कालावधीत पीडित महिलेवर वारंवार आळीपाळीने लैंगिक अत्याचार केले.आरोपींनी महिलेला कधी शेतात नेत तर कधी फोन करून घरी बोलवत तिच्यावर अत्यार केला. तिने नकार देताच आरोपी तिला धमकी द्यायचे. दोन वर्ष या नराधमांनी महिलेवर लैंगिक अत्याचार केले. अखेर सततच्या त्रासाला कंटाळून पीडित महिलेनं रावणवाडी पोलीस स्टेशनमध्ये तिघांविरोधात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी या प्रकरणात देंवेंद्र उर्फ बंडू मानकर, राजू मानकर आणि आणखी एकाला अटक केली आहे. या घटनेनं गोंदियामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close