शाशकीय

वन्यप्राण्याची अवैध शिकार, दोघांना अटक, वन्यजिव कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल

Spread the love

यवतमाळ : व्यक्ती वन्यप्राण्याची शिकार करून त्याचे मास विक्री करणाऱ्या दोघांना रंगेहात अटक केली आहे. ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी पांढरकवडा यांच्या मार्गदर्शात वसंतनगर येथे करण्यात आली. याप्रकरणी दोघांवर वन्यजिव कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
राजु शेषेराव पवार, रा. पारवा, ता. घांटजी तसेच अनिल वसंता शेडमाके, (वय 36), रा. केगांव, ता. केळापूर असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. केळापूर तालुक्यातील वसंतनगर येथे सदर आरोपी हे बाहेर गावातील असून वन्यप्राण्याची शिकार करून त्याचे मास गावात विक्री करित आहे. अशी माहिती परिविक्षाधिन वनपरिक्षेत्र अधिकारी प‌द्मभुषण शिवराम राजगुरू यांनी मिळली. त्यावरून त्यांनी आपल्या अधिनिस्त पथकाला कारवाई करीता वसंतनगर येथे रवाना केले. यावेळी गावा शेजारी तु-याट्याचे झोपडीत बसुन असलेल्या संबधीत दोघांना ताब्यात घेतले. पंचासमक्ष झोपडीची झडती घेतली असता त्या गोपडीत जर्मनी गंजात शिजविलेले मास आढळून आले. वन्यप्राण्याची शिकार केलेले हे मांस असल्याचे आरोपींनी पंचासमक्ष कबुल केले. यावेळी वन्यप्राण्यास पकडण्याकरिता वापरत असलेले साहित्य जप्त करण्यात आले आहे. सदर आरोपींवर वनजीव संरक्षण अधिनियम 1972 नुसार वनगुन्हा दाखल करून न्यायालयीन कार्यवाही करण्यात आली. .
ही कार्यवाही उपवनसंरक्षक पांढरकवडा. प्रकाष्ठ निष्कासन अधिकार। पांढरकवडा यांचे मार्गदर्शनाखाली पार पाडली, पुढील तपास परिविक्षाधिन (भा. व. से.) तथा वनपरिक्षेत्र अधिकारी पांढरकवडा (प्रा.) पद्‌द्मभुषण शिवराम राजगुरू यांच्या मार्गदर्शनात वनपाल एस. जि. बोडखे, क्षेत्र सहा. पांढरकवडा, पि. व्ही. सोनुले, क्षेत्र सहा. पाटणबोरी, वि. एस. चोधरी क्षेत्र. सहा. उमरी, वनरक्षक श्री आय. क्यू. मिझां, पाढरकवडा विट, डि. जि. जक्कावार वनरक्षक तिवसाळा बिट, व कु. व्हि. आय. आडे, वनरक्षक कोंडी बिट, वनरक्षक कु. आर. एस. सोनी, वनरक्षक फिरते पथक पांढरकवडा इतर वनकर्मचाऱ्यांनी केली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close