एका राजकीय पुढाऱ्याचा निकतवर्तीय असल्याची चर्चा
पुढाऱ्याने आवर घालण्याची मागणी
धामणगाव रेल्वे / प्रतिनिधी
तालुक्यातील जळगाव डेपोत आज राडा झाला असता मध्यस्थी साठी कोण्या ‘ वैभव ‘नावाच्या व्यक्तीचा फोन आला असल्याचे समजते. त्यामुळे हा वैभव नेमका कोण अशी वाळू माफिया आणि पत्रकारात चर्चा आहे. स्वतःला एका राजकीय पुढाऱ्याचे निकटवर्तीय म्हणवून घेणारे अनेक लोक वाळू डेपोत लुडबुड करत असल्याची चर्चा आहे.
आज वाळू डेपोत राडा झाला असता तक्रारदार यांना कोण्या वैभव नावाच्या व्यक्तीने फोन करून पोलिसात तक्रार करु नका असा दोन केल्याचे बोलल्या जात आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याला फोन करून थांबण्यास सांगणारा हा वैभव कोण अशी चर्चा वाळू माफिया आणि पत्रकार वर्गात आहे .
एका राजकीय पुढाऱ्याचा निकटवर्तीय असल्याची चर्चा – सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार वैभव नावाचा हा व्यक्ती एका राजकीय पुढाऱ्याचा निकटवर्तीय असल्याचे समजते.
राजकीय पुढाऱ्याचा जवळच्या लोकांचा वाळू डेपोत हस्तक्षेप – सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार या राजकीय पुढाऱ्याचा जवळील अनेक लोकांचा वाळू डेपोत हस्तक्षेप असून ते अनेक प्रकरणात लुडबुड करुन स्वतःचे हित साधून घेत असल्याची चर्चा आहे.
पुढाऱ्याने अश्या कार्यकर्त्याना आवर घालावा – मागणी
या पुढाऱ्याचा कार्यकर्त्यांची सध्या सगळ्या क्षेत्रात लुडबुड वाढली आहे. स्वतःला पुढाऱ्याचे जवळचे दाखवून हे लोक अधिकाऱ्यांवर दबाब आणत असल्याचे देखील अधिकाऐ वर्गात चर्चा सुरू आहे. ( क्रमशः)