शेजारी राहणाऱ्या मुलीला केले गर्भवती, शेजारी दुकानदाराचा प्रताप

या घटनेची माहिती पीडितेच्या मामाला समजली असता, त्याने पीडितेला मारहाण केली आणि मोबाइल फोन तोडून टाकला. एकेदिवशी पीडित तरुणी ही किराणा दुकानाच्या मालकाच्या फोनवर बोलत होती. दरम्यान, 45 वर्षीय प्रफुल्ल साखरकरने त्या तरुणीला सांगितलं की, ती ज्या तरुणाशी बोलत आहे त्याला भेटायचे असेल, तर त्याला किराणा दुकानात बोलावू शकतो. पीडित महिला तिच्या तरुणाला चार ते पाच वेळा भेटली. पीडित तरुणीनं सांगितलं की, जेव्हा ती आणि तिचा पुरुष मित्र दुकानात बोलत असत, तेव्हा आरोपी मोबाइल फोन घेऊन त्यांचा पाठलाग करत असे.
पीडितेकडे दुकानदारांनी लज्जास्पद मागणी केली असता, पीडितेनं नकार दिला. काही दिवसानंतर आरोपीने पीडितेला फोनवरून लालच दाखवून दुकानात बोलावण्यात आले आणि पीडितेवर लैंगिक अत्याचार केला. पीडितीने याबद्दल कुटुंबाला काहीच सांगितले नाही.
काही दिवसानंतर आरोपीने पीडितेच्या आजीला सांगितलं की, जर काही सामान हवं असल्यास तुम्ही नातीला पाठवा. त्यानंतर पीडितेला तिच्या आजीने दुकानदाराकडे पाठवले. पीडिता दुकानदाराकडे गेली असता, दुकानदाराने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला, नंतर दुकानदाराने पीडितेला धमकी दिली की जर याबाबत कोणाला काही सांगितल्यास कुटुंबाला फोनवरील रेकॉर्डिंग शेअर करेन.
तरुणी गर्भवती राहिली
नंतर जून महिन्यात पीडितेला मासिक पाळी आली नाही, तिने हे तिच्या आईला सांगितले, तिच्या आईने पीडितेला डॉक्टरकडे नेले, जिथे डॉक्टरांनी तिला दोन ते तीन चाचण्या करण्यास सांगितल्या, परंतु पैशांअभावी त्या चाचण्या झाल्या नाहीत. काही दिवसांनी पीडिता नागपूरला तिच्या मामाकडे गेली, तेथील डॉक्टरांनी तिची तपासणी केली असता, डॉक्टरांनी सांगितले की ती गर्भवती आहे. पीडिता तिच्या कारंजा शहरात परत आली आणि तिच्या आईसोबत पोलीस ठाण्यात पोहोचून तिने तक्रार दाखल केली. कारंजा शहर पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी इम्रान पठाण यांनी सांगितले की, पीडितेच्या तक्रारीवरून 45 वर्षीय प्रफुल्ल साखरकर याच्या विरोधात बीएनएस आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे.




